Download App

वर्ध्यात बोगस बियाणांची विक्री करणाऱ्या १० जणांच्या टोळीला अटक, दीड कोटींचे बियाणे जप्त

  • Written By: Last Updated:

वर्धा : २३ जून पासून मान्सून (Monsoon) हजेरी लावणार असल्यानं विदर्भात शेतकऱ्यांची सोयाबीन, कपाशीसह विविध बियाणे खरेदीसाठी (Buying seeds) लगबग सुरू झाली. याचाच फायदा घेऊन अनेक बोगस बियाणांची (Bogus seeds) विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार वर्ध्यात उघडकीस आला. वर्ध्यातील बनावट कापूस बियाणे बनविणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी बुधवारी (१४) छापा टाकला. या छाप्यात कारखान्यातून तब्बल १ कोटी ५५ लाख किमतीचे बोगस बियाणे जप्त करण्यात आले. दरम्यान, पोलीस तपासात या बियाण्यांचे गुजरात कनेक्शन समोर आले आहे. एक कोटी किमतीचे हे बियाणे गुजरातमधून आणल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दहा जणांना अटक केली आहे. (Bogus seeds worth 1.5 crore seized in Wardhya, 10 people arrested)

https://www.youtube.com/watch?v=Yc2Q59LsL1s

मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा शहरातील म्हसाळा परिसरात या बनावट बियाणांची निर्मिती करण्यात येत होती. गेल्या काही दिवसांपासून हा बनावट बियाणे बनवण्याचा कारखाना सुरू होता. राजू जयस्वाल असे या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे त्याने राहत्या घरी बनावट बियाणे बनवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागल होता. अखेर रहिवाशांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अचानक घरावर छापा टाकल्याने ही घटना उघडकीस आली.

5 स्टार इमारतीप्रमाणे दिसणारं देशातील पहिलं खासगी विमानतळ तुम्ही पाहिलय का? 

पोलिसांनी घरातून बियाणे उत्पादीत करण्याचे साहित्य, नामांकित कंपन्यांचे रॅपर जप्त केले. आरोपीने गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून हे बियाणे वर्ध्यात आणले होते. आरोपी बोगस बियाणे घरीच तयार करून त्यावर नामांकित कंपनीचे रॅपर लावून विकत होते. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आतापर्यंत 14 टन माल शेतकऱ्यांना विकला आहे. आरोपी हे बनावट बियाणे विविध कृषी केंद्र व खाजगी कृषी केंद्रामार्फत विकत होता. तसेच आरोपीने सेलू, नागपूर, वर्धा, यवतमाळ आदी ठिकाणी 14 टन बोगस बियाणांची विक्री केली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, या बनावट बियाण्यांची खरेदी ज्या शेतकऱ्यांनी खरेदी केली, ते अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस बियाणे खरेदी करताना खरेदी पावती अवश्य घ्यावी. बोगस बियाणांची विक्री होत असल्याचं समजताच तात्काळ कृषी विभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले.

 

Tags

follow us