Download App

केंद्रीय पथकाने उघड केला तांदळाचा काळाबाजार, सात राईस मिलर्सवर तीन वर्षाची बंदी

  • Written By: Last Updated:

गोंदिया : धानाचे कोठार म्हणून गोंदिया जिल्ह्याची राज्यासह देशात ओळख आहे. त्यातच जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन (District Marketing Federation) तसेच आदिवासी विकास महामंडळाच्या (Tribal Development Corporation) वतीने संचालित आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्रावरून शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यात येते. त्यानंतर खरेदी केलेला धान भरडाईसाठी राईस मिलर्स (Rice Millers) चालकांना देण्यात येतो. मात्र मागील काही वर्षात राईस मिलर्स चालकांचा घोटाळा अनेक वेळा समोर आला. त्यातच भरडाईतील धान घोटाळ्याची चौकशी केंद्रीय पथकाच्या माध्यमातून करण्यात आली. यामध्ये देवरी तालुक्यातील ७ राईस मिलर्सवर भरडाईसाठी तीन वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. हा प्रकार एकट्या देवरी तालुक्यात नसून संपुर्ण जिल्ह्यात असल्याने प्रकरणाची चौकशी केल्यास अनेक घबाळ समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Central team exposes black market of rice bans seven rice millers for three years)

https://www.youtube.com/watch?v=fgNKR9V0d6M

सविस्तर असे की, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन तसेच आदिवासी विकास महामंळाने जिल्ह्यात खरेदी केलेल्या शासकीय धान्याची भरडाई करते. यासाठी गोंदिया जिल्ह्यातील इतर राईस मिलर्ससह देवरी तालुक्यातील वसंत राईस मिल डोगरगाव, तिरुपती राईस मिल देवरी, महाराष्ट्र एग्रो इंडस्ट्री चिचगड, भगवती राईस इंडस्ट्री देवरी, इंडियन फूड प्रॉडक्ट चिचगड, बालाजी राईस मिल बोरगाव बाजार तसेच माँ शक्ती राईस इंडस्ट्री देवरी यांच्याशी धान्य भरडाईचा करार केला होता.

मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत फेटा घालणार नाही; पंकजा मुडेंनी बाहेर काढलं मराठा कार्ड 

भरडाई केलेला तांदूळ देवरी तालुक्यात जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यलयाने भाड्याने घेतलेल्या आशु गोदामात एप्रिल २०२२ मध्ये जमा करण्यात आला होता. त्यावेळी तांदूळ गुणवत्ता अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सतीश अगडे यांनी या सातही राईस मिलर्सने जमा केलेला २७ लॉट तांदळाची गुणवत्ता तपासून तांदूळ जमा केला होता. मात्र ७ मे रोजी आशु गोदामात तांदूळ तपासणीकरिता आलेल्या केंद्रीय पथकाने हा तांदूळ मानवी खाण्यास योग्य नसल्याचे सांगत या तांदळाचे लॉट रद्द करीत सातही राईस मिलर्सला तीन वर्षाकरिता शासकीय धान्याची भरडाई करता धान्य देऊ नये असे निर्देश दिले. म्हणून या राईस मिलला काळ्या यादीत टाकण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकरी चिन्मय गोतमारे यांनी दिली आहे.

मिलर्सनी घेतली न्यायालयात धाव
जिल्हा पुरवठा कार्यलयाने देवरी तालुक्यात एप्रिल २०२२ ला नियुक्त केलेले तांदूळ गुणवत्ता अधिकारी सतीश अगडे यांनी तांदळाची गुणवत्ता तपासून सातही राईस मिलर्सचा तांदूळ गोदामात जमा करून घेतला होता. तत्कालीन तांदूळ गुणवत्ता अधिकारी सतीश अग यांनी तांदूळ जमा करताना हा तांदूळ कुठल्या पद्धतीने तपासून घेतला होता. जो आज रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे यांच्या कार्यप्रणालीवर राईस मिलर्सने प्रश्न चिन्ह निर्माण करीत न्यायालयात धाव घेतली आहे.

Tags

follow us