Download App

भाजप नेत्याच्या पत्नीचा गोळीबारात मृत्यू; चंद्रपूरमध्ये खळबळ उडवणारी घटना

  • Written By: Last Updated:

Chandrapur :  चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे सोमनाथपूर वॉर्डमधील भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या घरी रविवारी रात्री 8.15 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. गोळी लागून सचिन डोहे यांची पत्नी पूर्वाशा सचिन डोहे (27) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच शेजारी राहत असलेले कोळसा व्यापारी लल्ली शेरगिल हे गंभीर जखमी झाले. कोळशाच्या तस्करीमुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सरसावले! पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश…

रात्री उशीरा आरोपीने पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे व त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात आलेले आहे. यामध्ये लल्ली शेरगिल हे देखील गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर रात्री चंद्रपुरातील रुग्णालयात उपचार सुरु होते. या घटनेच्यावेळी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे आपले काका व माजी नगरसेवक राजेंद्र डोहे यांच्यासोबत बाहेर गेले होते. यामध्ये पूर्वाशा यांचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सरसावले! पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश…

लल्ली शेरगिल हे सचिन डोहे यांच्या घराशेजारीच राहत असून, गोळीबार करणाऱ्याने त्यांचा पाठलाग केल्याने जीव वाचविण्यासाठी हे डोहे त्यांच्या घरात शिरले. पाठलाग करणाऱ्याने गोळीबार केला त्याचवेळी पूर्वाशा घराबाहेर आल्याने त्यांच्या छातीत गोळी लागली. गोळीबाराचा आवाज ऐकू येताच घरातील मंडळींनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना राजुरा येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्वाशा डोहे यांना मृत घोषित केले.

 

Tags

follow us