यवतमाळ : अधिवेशनाच्या गदारोळानंतर ठाकरे गटा-शिंदे गटाच्या नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपाचं सत्र अद्यापही सुरुच आहे. आमच्या एका शिवसैनिकांकडूनही माजी मंत्री संजय राठोड यांनी पैसे घेऊन काम केलं असल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. यवतमाळमध्ये एका कार्यक्रमात चंद्रकांत खैरे आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
….तर शिंदे-फडणवीस सरकारची अडचण होणार, ज्योतिषाचार्य सिध्देश्वर मारटकर
ते म्हणाले, मंत्री असताना संजय राठोड यांनी अनेक प्रकरणांमध्ये पैसे घेतले आहेत. एकदा मी संजय राठोडांना पकडलं होतं. आमच्या एका शिवसैनिकाला मदत हवी होती. तेव्हा मी त्यांना शिवालयामध्ये बोलोवून घेतलं होतं.
‘ 21 दिवस रोज पाच वेळा नमाज’, मारहाणी प्रकरणी Malegaon कोर्टाची तरुणाला शिक्षा
त्यावेळी संजय राठोडांना मी हे काम करा, तेव्हा करतो असं मला सांगितलं होतं. त्यानंतर संजय राठोड यांनी त्या शिवसैनिकाकडूनही काही पैसे घेऊन काम केलं असल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला.
त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात त्यांना मंत्रिपद देण्यात आलं. तेव्हाच पूजा चव्हाण प्रकरण समोर आलं होतं. तेव्हा ते खूप अडचणीत आले होते, आमच्या भगीनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर गंभीर आरोपही केले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
गोगावलेंची जीभ काय घसरली अन् सारा खेळच पालटला; मविआ पुन्हा फॉर्मात..
एकंदरीत कोणत्याही प्रकरणामध्ये सध्याचे शिंदे-फडणवीस सरकारमधील नेते पैसे घेऊनच काम करीत असल्याचा आरोपही चंद्रकांत खैरे यांनी यावेळी केला आहे. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरण्यात येत असल्याचं दिसून येत असतानाच आता संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर अधिवेशनात मोठा गदारोळ सुरु आहे.
अशातच चंद्रकांत खैरे यांनी माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केल्याने त्यांच्या या आरोपांवर संजय राठोड काय उत्तर देणार याची सर्वांनी उत्सुकता लागली आहे.