Download App

Gram Panchayat Election : राज्यातील 2,369 ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात, कोण मारणार बाजी?

  • Written By: Last Updated:

Gram Panchayat Election: पुढील वर्षी देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी आजचा दिवस सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचा आहे. कारण, आज सर्वच राजकीय पक्षांची लिटमस टेस्ट आहे. राज्यातील २,३५९ ग्रामपंचायत निवडणुकांचे (Gram Panchayat Election) निकाल आज जाहीर होणार आहेत. अनेक ठिकाणी मतमोजणीला सुरूवात झाली.

भीषण अपघात! बस पुलावरून खाली रेल्वे रुळावर कोसळली, 4 जणांचा जागीच मृत्यू

काल राज्यातील सुमारे 2,359 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी शांततेत मतदान पार पडले. प्राथमिक अंदाजानुसार, राज्य निवडणूक आयोगाने सरासरी 74 टक्के मतदानाचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे निकाल दुपारी 12 ते 1 या वेळेत जाहीर होणार आहेत.

राष्ट्रवादीमधील फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे निकालही आज जाहीर होणार आहेत. पुणे जिल्ह्यात अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर या निवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री दत्तमामा भरणे यांच्या प्रतिष्ठापणाला लागल्या.

पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजप विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशी लढत झाली. त्यामुळे राज्याचे लक्ष आता ग्रामपंचायत निकालाकडे लागले आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 86.18 टक्के मतदान मावळ तालुक्यात झाले. पुणे जिल्ह्यात 231 ग्रामपंचायतींची पंचवार्षिक आणि 142 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या होत्या. जिल्ह्यातील पंचवार्षिक निवडणुकीसाठीच्या 231 पैकी दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या. त्यामुळे उर्वरित 229 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यापैकी 43 ग्रामपंचायती बिनविरोध झाली होती. त्यामुळं काल उर्वरित 186 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान झाले.

पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी-

वेल्हे – 82.24, भोर – 83.50, पुरंदर- 83.30, दौंड – 78.85 , इंदापूर – 78.78, बारामती- ८५.९, जुन्नर -73.96, आंबेगाव -5.28, खेड -82.24,

शिरूर -80.94, मावळ-86.18, मुळशी – 82.18

नागपुरात 362 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सुरुवात
नागपूर जिल्ह्यातील 362 ग्रामपंचायतींसाठी 85 टक्के मतदान. नागपूर जिल्ह्यात चंद्रशेखर बावनकुळे, सुनील केदार, अनिल देशमुख, श राजू पारवे, सलील देशमुख, आशिष देशमुख आदी नेत्यांनी प्रतिष्ठा मिळवली आहे.

दरम्यान, नक्षलग्रस्त भाग वगळता राज्यातील सर्व ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज सुरू झाली. तर गडचिरोली आणि गोंदियातील मतमोजणी उद्या, मंगळवारी (ता. 7) होणार आहे. दरम्यान, या ग्रामपंचायत निवडणूमकीत विजयाचा गुलाल कोण उधळतो, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us