भीषण अपघात! बस पुलावरून खाली रेल्वे रुळावर कोसळली, 4 जणांचा जागीच मृत्यू

  • Written By: Published:
भीषण अपघात! बस पुलावरून खाली रेल्वे रुळावर कोसळली, 4 जणांचा जागीच मृत्यू

Rajasthan Accident: राजस्थान येथील दौसा येथील राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघा (A terrible accident) झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून रेल्वे रुळावर कोसळली. या भीषण अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 40 हून अधिक प्रवासी जखमी झाले. हाती आलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. दौसा जिल्ह्यात (Dausa district) सोमवारी पहाटे ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जरांगेंनी मराठा समाजात फूट पाडू नये, आम्हाला कुणबी प्रमाणपत्रे नको; मराठा समाजातील महिलांची भूमिका 

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस हरिद्वारहून जयपूरच्या दिशेने जात होती. या बसमध्ये सुमारे 40 ते 45 प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, रविवारी मध्यरात्री सव्वा दोन वाजताच्या सुमारास दौसा येथील राष्ट्रीय महामार्ग-21 वरील पुलाजवळ बस आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळं बस थेट पुलाचा कठडा तोडून खाली कोसळली.

बसचा अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातात आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 24 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी 4 प्रवाशांचे मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

दरम्या, जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 5 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जयपूरला रेफर करण्यात आले आहे. रेल्वे नियंत्रण कक्षाला अपघाताची माहिती मिळताच जयपूर-दिल्ली रेल्वे मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांची वाहतूक तत्काळ थांबवण्यात आली. रेल्वे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. या भीषण अपघातामुळं घटनास्थळी बराच वेळ गोंधलाचे वातावरण होते.पोलिसांनी मृतांचा ओळख पटवून त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मदत आणि बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर आणि जखमींवर उपचार झाल्यानंतर अपघाताचा तपास सुरू होईल, असे पोलिस-प्रशासनाचे म्हणणे आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube