Road Accident : कर्नाटकात तीन भीषण अपघात! दोन ठार तर 9 जण जखमी

Road Accident : कर्नाटकात तीन भीषण अपघात! दोन ठार तर 9 जण जखमी

Road Accident : देशातील रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ (Road Accident) होत आहे. रस्ता सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने अपघात घडत असून यात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. आताही भीषण अपघाताची घटना कर्नाटक (Karnataka)राज्यात घडली आहे. मागील 24 तासांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत दोघे ठार तर 9 जण जखमी झाले आहेत. जखमींतील 7 जणांची प्रकृती स्थिर असून अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत. याआधीही या रस्त्यावर अनेक अपघात झाले असून यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर एम. के. हुबळीजवळ बुधवारी रात्री दुचाकीची धडक झाली. या अपघातात दोन पादचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हुबळीतील एका ढाब्यातून जेवण करून परतत असताना रस्ता पार करत असताना त्यांनी दुचाकीने जोराची धडक दिली. या धडकेत एकजण जागीच ठार झाला. तर दुसरा व्यक्ती दवाखान्यात उपचार घेत असताना मयत झाला. तर या दुचाकीवर मागे बसलेला व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

Rajasthan Election : BJP कडून तिसरी यादी जाहीर, गेहलोत यांच्या विरोधात ‘हा’ दिग्गज उमेदवार

बुधवारी रात्री आणखी एक अपघाताची घटना घडली. या अपघातात एकूण सात जण जखमी झाले. रात्री बार वाजण्याच्या सुमारास हा अपघात कणबर्गी येथील तलावाजवळ घडला. गोकाक तालुक्यातील उरबेनपट्टी येथील लोक राज्योत्सव मिरवणूक (Karnatakarajyotsavabelagavi2023) पाहण्यासाठी बेळगावला आले होते. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास गोकाकडे जात असताना ब्रेक फेल झाल्याने गाडी एका बाजूला झुकली. या वाहनात एकूण अकरा प्रवासी होते. त्यापैकी सात जण जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील वाहतुक

यानंतर काकती येथेही एक अपघात झाला. या अपघातात चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो गाडीवरून खाली पडला. त्याला दुखापत झाली. उपचारांसाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. रस्ते अपघातांच्या घटना राज्यात सातत्याने वाढत आहेत. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष हे त्यामागील एक मोठे कारण आहे.

Road Accident : काळाचा घाला! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

रस्त्याच्या कडेला पायी (Road Accident) जाणारी माणसेही असतात. गाव किंवा रहदारीचा परिसर आला की वाहनाचा वेग मर्यादित करणे आवश्यक असते. तसेच रस्त्याच्या कडेला कुणी आहे का हे देखील चालकांना पहावे लागते. मात्र, बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष होते. अंतर लवकर पार करण्याच्या नादात अपघात घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देण्याची आणि वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube