Rajasthan Election : BJP कडून तिसरी यादी जाहीर, गेहलोत यांच्या विरोधात ‘हा’ दिग्गज उमेदवार
Rajasthan Election 2023: भारतीय जनता पक्षाने (BJP) राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. या यादीत भाजपने 58 उमेदवारांना तिकीट दिले आहे. भाजपने खंडेलामधून सुभाष मील, वल्लभनगरमधून उदय लाल डांगी आणि करौलीमधून दर्शनसिंग गुर्जर यांना उमेदवारी दिली आहे.
काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या सुमित्रा पुनिया यांनाही पक्षाने तिकीट दिले आहे. तिसऱ्या यादीत भाजपने एकाही खासदाराला उमेदवारी दिलेली नाही. पक्षाने जयपूरच्या हवामहल मतदारसंघातून महंत बाल मुकंदाचार्य आणि सरदारपुरामधून अशोक गेहलोत यांच्या विरोधात महेंद्र सिंह राठोड यांना तिकीट दिले आहे.
गेहलोत आणि पायलट यांच्याविरोधातही ‘हे’ उमेदवार
तिसर्या यादीत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात भाजपनेही उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. गेहलोत यांच्या विधानसभा मतदारसंघ सी सरदारपुरा येथून भाजपने डॉ. महेंद्रसिंह राठोड यांना तिकीट दिले आहे. सचिन पायलट यांच्या विरोधात भाजपनेही अजितसिंग मेहता यांना भाजपने टोंक मतदारसंघातून तिकीट दिले आहे. यावेळी पक्षाने टोंकमधून युनूस खान यांचे तिकीट रद्द केले आहे.
आतापर्यंत 182 जागांची घोषणा, अद्याप 15 जागा शिल्लक
याआधी भाजपने दोन याद्या जाहीर केल्या असून एकूण 124 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या तिसऱ्या यादीनंतर राज्यातील 200 विधानसभा जागांपैकी एकूण 182 जागांसाठी त्यांनी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. 18 उमेदवारांची नावे अद्याप जाहीर व्हायची आहेत.
राजस्थानमध्ये नामांकनाचा कालावधी सुरू झाला आहे. मात्र, पक्षाने अद्यापही अनेक जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. मात्र, याबाबत बैठका झाल्या. कालच पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली, त्यात या नावांना मंजुरी देण्यात आली. कालच्या बैठकीनंतर आज पक्षाने 58 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
151 जागांसाठी केले कॉंग्रेसने उमेदवार उभे केले
दोन दिवसांपूर्वी काँग्रेसने राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली होती. यापूर्वी काँग्रेसने उमेदवारांच्या तीन यादीत 95 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. त्यानंतर चौथ्या यादीत 56 उमेदवारांचा समावेश करत पक्षाने राजस्थानमधील 200 जागांपैकी 151 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.