भूकंपाने विदर्भ हादरला! नागपूर, भंडारा, गोदिंयात सौम्य धक्के; तेलंगाणात भूकंपाचे केंद्र

विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाने नागरिकांत भीतीचं वातावरण आहे.

Earthquake

Earthquake

Earthquake in Maharashtra : तेलंगाणा राज्यातील मुलुगू जिल्ह्यात आज पहाटे भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. हा भूकंप मुलुगू जिल्ह्यात झाला असला तरी त्याचे धक्के महाराष्ट्राला बसले आहेत. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाने नागरिकांत भीतीचं वातावरण तयार झालं आहे. सुदैवाने या भूकंपाने कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच मोठे नुकसानही झालेले नाही.

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, चामोर्शी या जिल्ह्यांत घराच्या वरच्या मजल्यांवर राहणाऱ्या लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. घरातील फ्रीज, भांडी आणि खिडक्यांच्या काचांना हादरे बसले. त्यामुळे भयभीत झालेल्या लोकांनी घराबाहेर धाव घेतली. या भूकंपात कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. नागरिकांनी दक्षता बाळगावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Video : रशियात भूकंप! रिश्टर स्केलवर भूकंपाची 7 इतकी तीव्रता; थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल

Exit mobile version