Uddhav Thackeray : दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मंत्री छगन भुजबळ (Chhgan Bhujbal) आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांच्याविरोधातील याचिका ईडीने (ED) उच्च न्यायालयातून मागे घेतली आहे. यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शाब्दिक हल्लाबोल केला आहे. भुजबळांनी कोणता चमत्कार केला हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे पेढे खायला जाणार आहोत, असा टोला लागवला.
ते म्हणाले की आजचा दिवस आनंदाचा आहे. आज छगन भुजबळ यांच्याकडे पेढे खायला जाणार आहोत. त्यांची चौकशी अचानक बंद केली. त्यांना काही दिवस, काही महिने तुरुंगात ठेवल्यानंतर त्यांना दमदाटी केली जात होती की तुम्हा जामीनावर आहात हे विसरु नका. मात्र आता कोणता चमत्कार भुजबळांनी केला? हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. त्यांच्याकडे आम्ही पेढे खायला जाणार आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray : भुजबळांकडे पेढे तर, पटेलांकडे…; अधिवेशनानंतर ठाकरेंचा प्लॅन ठरला
ते पुढं म्हणाले, नंतर माझा विचार असा आहे की संसदेच अधिवेशन संपल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे जेवायला जाणार आहे. त्यांना विनंती करणार आहे की मिर्ची कम जेवण द्या, असा टोला उद्धव ठाकरेंनी लावला.
मोठी बातमी : राजस्थानचा पेच सुटला; भाजपकडून पुन्हा सरप्राइज; मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मांची वर्णी
दरम्यान, छगन भुजबळ यांच्याविरोधातील याचिका सप्टेंबर महिन्यात सुनावणीसाठी आली होती. त्यावेळी ही याचिका नेमकी कशासाठी केली होती हेच आठवत नसल्याचे आणि याचिकेची प्रत सापडत नसल्याचे ‘ईडी’च्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले होते. या सुनावणीवेळी, छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका मागे घेण्यात येत असल्याचे ‘ईडी’च्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयानेही ही मागणी मान्य करत याचिका मागे घेण्यास परवानगी दिली आहे. भुजबळ यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे.