Download App

ED Raid : ईडीची मोठी कारवाई; एकाच दिवशी टाकल्या 15 ठिकाणांवर छापे, कोट्यावधींची रोकड जप्त

  • Written By: Last Updated:

नागपूर : अलिकडेच ईडीने (ED) नागपुरचे प्रसिद्ध व्यापारी रामदेव अग्रवाल (Ramdev Aggarwal) यांचे ऑफिस आणि निवासस्थानी छापेमारी केली होती. त्यानंतर आज ईडीने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली. ईडीने आज नागपुर आणि मुंबईसह तब्बल 15 ठिकाणी धाडी टाकल्या. या छापेमारीत 5.21 कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि 1.21 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. अनेक व्यापाऱ्यांच्या गुंतवणुकीच्या फसवणुकी प्रकरणात ईडीने ही छापेमारी केली आहे.

ईडीने माहितीनुसार, नागपूरचे अनेक स्टील, लोह आणि रिअल इस्टेट व्यावसायिक ईडीच्या रडारवर आहेत. दरम्यान, अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या पंकज नंदलाल मेहाडिया आणि त्याच्याशी संबंधित एक दोन नव्हे तर पंधरा ठिकाणांवर ईडीने छापे टाकले. या छाप्यांमुळे नागपुरात खळबळ उडाली आहे. यात पंकज मेहाडिया, लोकेश जैन, कार्तिक जैन, बालमुकुंद लालचंद कील आणि प्रेमलता नंदलाल मेहदिया यांचे निवासस्थान आणि कार्यालयाचा समावेश आहे. या छाप्या दरम्यान ईडीने 5.51 कोटी रुपयांचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने, तर सुमारे 1.21 कोटी रुपयांची रोकड, डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आले आहेत.

दरम्यान, या सगळ्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकल्यानंतर त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती ईडीने दिली आहे. या १५ ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या सर्वांचा तपास सुरू आहे.

ईडीच्या म्हणण्यानुसार, ईडीने पंकज नंदलाल मेहदिया, लोकेश जैन, कार्तिक जैन, बालमुकुंद लालचंद कील, प्रेमलता नंदलाल मेहाडिया यांच्याविरुद्ध नागपूर सीताबल्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीने केलेल्या मनी लाँड्रिंग तपासात पंकज मेहदिया आणि त्यांच्या साथीदारांनी पॉन्झी स्कीम सुरु केली होती. 2004 ते 2017 या कालावधीत केलेल्या गुंतवणुकीवर टीडीएस कापून 12 टक्के खात्रीशीर परतावा देण्याचे आश्वासन देऊन विविध गुंतवणूकदारांना आमिष दाखवले होते.

ED Raid : ईडीची मोठी कारवाई; एकाच दिवशी टाकल्या 15 ठिकाणांवर छापे, कोट्यावधींची रोकड जप्त

दरम्यान, आता या छापेमारीतून काय समोर येतं? यासंदर्भातील उत्सुकता नागपूरकरांना लागली आहे.

 

Tags

follow us