Download App

फडणवीस म्हणाले…आम्ही कधीच आडमुठी भूमिका घेतली नाही

नागपूर : जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. यामुळे राज्यातील अनेक सरकारी विभागातील कामकाजाची व्यवस्था कोलमडली होती. मात्र सरकारने आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी संप मागे घेतल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्व संघटना आणि सरकारी कर्मचार्‍यांचे आभार मानले आहेत. तसेच सरकारने नेहमीच कर्मचाऱ्यांची भूमिका जाणून घेतली आहे. तसेच आम्ही कधीच आडमुठी भूमिका घेतली नाही असे यावेळी फडणवीस म्हणाले आहे.

नागपूर येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारी कर्मचार्‍यांनी संप मागे घेतला, ही आनंदाची गोष्ट आहे. आज दुपारी माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली होती. आम्ही कुठलाही अहंभाव न बाळगता सरकारी कर्मचार्‍यांची भूमिका जाणून घेतली. आम्ही कधीही आडमुठी भूमिका घेतली नाही आहे.

बायकोला पेन्शन मिळाल्याचा भलताच आनंद, नवऱ्याने थेट तिला…

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, सरकारी कर्मचार्‍यांचे हित पाहणारेच आम्ही आहोत. सामाजिक सुरक्षेची भूमिका तत्व म्हणून आम्ही आधीच मान्य केली होती. आता चर्चेचे मुद्दे निश्चित करुन समितीपुढे ते ठेवण्यात आले आहेत. समिती त्यावर निर्णय घेईल.

गौतम अदानींच्या संपत्तीतील वाढ पाहून तुम्ही व्हाल शॉक, पहा नेमकं काय घडलं

कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे आम्ही पहिल्या दिवशीपासून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत होतो. अखेर शासनाच्या प्रयत्नाला यश आले असून आज राज्यातील संपकरी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला याचा आनंद आहे. समितीला 3 महिन्यांचा कालावधी दिलेला आहे, त्यामुळे कालबद्ध वेळेतच समिती आपला अहवाल देईल. मी कर्मचार्‍यांचे अभिनंदन करतो आणि पुढाकार घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचेही विशेष आभार मानतो.

Tags

follow us