FDA Commissioner Tukaram Mundhe: अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे (FDA Commissioner Tukaram Mundhe) यांच्याकडून बेकायदेशीर औषधविक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू आहे. एफडीएच्या पथकाने नागपूरमधील न्यू एरा (New Era Hospital) हॉस्पिटलमध्ये मोठी कारवाई केलीय. या हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरद्वारे सलग्न दुकानातून औषध खरेदी सक्ती न करण्याच्या एफडीएच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आलेत. तसेच विक्रीसाठी विना परवाना जागेत ठेवलेला 20 लाखांचा औषध साठा जप्त करण्यात आला आहे.
नागपूर येथील न्यू एरा रुग्णालयाच्या मेडिकल स्टोअरबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार शनिवारी नागपूरच्या अन्न व औषध प्रशासनाने न्यू एरा हॉस्पिटल संलग्न न्यू इरा हॉस्पिटल फार्मसी येथे चौकशी केली. या तपासणी दरम्यान उपलब्ध औषधी साठ्याच्या पडताळणीमध्ये आढळून आलेल्या तफावती अनुषंगे केलेल्या चौकशीत रुग्णालयाच्या बेसमेंटमधील खोलीमध्ये विविध औषधांचा साठा विनापरवाना विक्रीकरीता साठवणूक केल्याचे आढळून आले. संबंधित जागेसाठी वैध औषध विक्रीपरवाना तसेच औषधांच्या खरेदी-विक्रीची कागदपत्रे संस्थेद्वारे सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे जागेचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. सदर औषधी साठ्यातून दोन औषधी नमुन्यांसाठी घेण्यात आले आहेत. तर उर्वरित 20 लाख 15 हजार किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे.
थेट रुग्णालयातील मेडिकलमधूनच औधष विक्री
पडताळणीमध्ये रुग्णालयाकडून आंतररुग्ण विभागातील रुग्णांना तथा त्यांचे नातेवाईकांना डॉक्टरकडून रुग्णांना लिहीलेल्या औषधांची प्रिस्क्रिप्शन प्रत रुग्णास किंवा त्यांचे नातेवाईकास न देता आंतररुग्ण विभागातील संगणकीय प्रणालीतून बनवून सरळ फार्मसीला पाठवून जात होते. रुग्णास किंवा त्यांच्या नातेवाईकास औषध घेण्यास बंधन केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंढे यांच्या रुग्णांना या रुग्णालयातील औषध विक्री दुकानातूनच औषध खरेदी करण्याची सक्ती नाही” या आदेशाचे पालन होत नसल्याचे आढळून आले आहे. रुग्णालयाबाहेर औषध खरेदी सक्ती नसल्याचा फलक, माहिती प्रदर्शित केल्याचे आढळून आले नाही. याशिवाय तपासणीवेळी केमिस्ट अँड ड्रगिस्ट नामफलकावर नमूद नसणे, मुदतबाह्य औषधी स्वतंत्र ठेवण्यास नामनिर्देशित व्यवस्था नसणे,
Schedule H 1 औषधांच्या खरेदी विक्री व उपलब्ध साठ्यामध्ये तफावत आढळणे, पेढीमध्ये तपासणी पुस्तक नमुना ३५ उपलब्ध नसने,
संस्थेस औषधे सौंदर्य प्रसाधने नियम १९४५ मधील तरतुदींचे अनुपालन होत नसल्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.
