Download App

हाथी चले बाजार कुत्ते भोके हजार, खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं…

जळगाव : हाथी चले बाजार कुत्ते भोके हजार, या शब्दांत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी शिंदे-फडणवीस सरकारमधील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांना सुनावलं आहे. यावेळी त्यांनी मंत्री पाटील यांच्यासह मंत्री गिरिश महाजनांवर निशाणा साधत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात अवैध धंद्यांबाबत करण्यात आलेल्या कारवाईबाबत विचारले असता फक्त दोनच जणांवरच का कारवाई सुरु आहे? असा सवालही त्यांनी प्रशासनाला केला आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, गुलाबराव पाटील यांना जिल्ह्यात दुसरा कोणी विरोधक नाही. त्यामुळे ते नेहमी माझ्यावर टीका करीत असतात. मला दुर केलं की, राजकारण साफ होणार. त्यामुळे मी काही कच्चा नाहीये, या शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.

तसेच अवैध धंद्याबाबत माझा आवाज मी उठवितो, मी त्यांना सोडा असं म्हणत नाही. पण प्रशासनाने यांना सोडलं आणि त्यांच्यावरच का कारवाई होत आहे. याबाबत मी पोलिसांना विचारलं असल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

पकिस्तानच्या माजी पंतप्रधानाच्या अडचणीत वाढ, कधीही होऊ शकते अटक

तसेच अवैध धंद्यांबाबत फक्त दोन लोकांवरच कारवाई होत आहे. अवैध धंदा गांजातून जर एक कोटी रुपये हप्ता जात असेल तर तो कोणाला मिळतो? असा सवाल उपस्थित करीत त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा फज्जा उडाला असल्याचा आरोपही केला आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात विरोधकांना मी एकटाच अडथळा आहे. त्यामुळे माझ्यावर ते टीका करतात. शेतीपिकांना भाव नाही. त्याकडे लक्ष नाही आणि माझ्यावर टीका करायची. त्यांच्यासमोर दुसरा कोण त्यांच्यासमोर नाहीये. त्यांनी केलेल्या टीकेची मी नोंद घेत नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. हे लोकं भूंकणारे आहेत, पण आपलं काम आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत.

शिवानीचं रुप पाहून पडाल प्रेमात…

गिरीश महाजनांनी जामनेर नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या बांधकामात भ्रष्टाचार केला आहे. तो भ्रष्टाचार या लोकांनी का दाबून ठेवला. त्याबाबत मी विधानसभेत प्रश्न विचारला असता मला ते उत्तर का देत नाहीत, असा खोचक सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Tags

follow us