Download App

साहित्यिकांनी निर्भीडपणे.., मंत्री Nitin Gadkari यांच्या उपस्थितीत मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

वर्धा : साहित्यिकांनी निर्भीडपणे आपले विचार मांडले पाहिजे, त्यांचा अधिकार राजकारण्यांनी मान्य केला पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. गडकरी 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते.

यावेळी गडकरी म्हणाले, साहित्यिकांनी समाजाला जोडण्याचं काम केलं आहे. समाजाला चांगल्या दिशेने नेण्याचं काम केलंय. जे चांगलं आहे ते त्रिकालबाधित सत्य आहे. हे त्रिकालवादी सत्य सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याच माध्यम साहित्य आहे. त्यातूनच सुखी समृध्द हिंदुस्थान असल्याचं ते म्हणालेत.

केवळ जगाची महाशक्ती होणं एवढंच महत्वाचं नाही. देशाला आणि विश्वाला कल्याण करणारा विचार देणारं साहित्य आहे. मला आज आनंद होतोय वर्ध्याच्या भूमिवर विचाराचं अमृत आपल्याला मिळालं आहे. या साहित्य संमेलनातून महाराष्ट्र्रालाच नाहीतर जगाला संदेश देण्यात काम होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.

वर्धा येथे सुरू असलेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आज सांगता झाली. संमेलनाचा समारोप सोहळा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी संमेलानचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे यांच्यासह साहित्यप्रेमी उपस्थित होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि विदर्भ साहित्य संघाच्यावतीने या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचं उत्तम आयोजन वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात वर्धा प्रशासनानं केलं. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह उपस्थित सर्वांनीच आयोजकांचं कौतुक केलं.

दरम्यान, वर्धा येथे 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले खरे, परंतु या साहित्य संमेलनाला साहित्यिक प्रेमींनी मात्र म्हणावा, तसा प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र होतं. 3 फेब्रुवारी रोजी परंपरागत ग्रंथ दिंडीने साहित्य संमेलनाला सुरुवात झाली होती. या संमेलनाच्या अनुषंगाने वर्धा नगरीतील नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

दरम्यान, काल संमलेनात नागराज मंजुळे, किशोर कदम, सयाजी शिंदे, अरविंद जगताप यांची मुलाखत बालाजी सुतार यांनी घेतली होती. यावेळी प्रांगण ओसंडून वाहिलेलं दिसून आलं.

Tags

follow us