Amravati Lok Sabha Constituency : अमरावती मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर (Amravati Lok Sabha) आली आहे. या मतदारसंघात रिपलब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी लोकसभेच्य निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अर्ज मागे घेताना त्यांनी आपण आता वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देणार असा विश्वास व्यक्त केला. या मतदारसंघात वंचित आघाडीनेही (VBA) उमेदवार दिला आहे. तसेच आनंदराज आंबेडकर यांनीही उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु, यामुळे मतविभागणी होऊन भाजपला फायदा होऊ शकतो याचा अंदाज आला. अमरावतीत भाजपला यश मिळू नये यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी जाहीर केले.
खासदार नवनीत राणा सहा महिन्यात जेलमध्ये दिसतील, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
आनंदराज आंबेडकर यांनी या संदर्भात एक पत्रक जारी केले आहे. या पत्रकात त्यांनी अमरावतीत वंचित आघाडीला पाठिंबा देत असल्याचेही जाहीर केले. वंचित आघाडीडे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचे (Prakash Ambedkar) लहान बंधू रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. यानंतर त्यांनी वंचित आघाडीकडे पाठिंब्याची मागणी केली होती. परंतु, वंचित आघाडीने पाठिंबा दिला नाही. यामुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे या पत्रकातून जाहीर केले.
वंचितच्या कार्यकर्त्यांनी केली होती लढण्याची विनंती
अमरावतीतून वंचिनेत प्राजक्ता पिल्लेवाण यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आनंदराज आंबेडकर यांनी निवडणूक लढविल्यास आंबेडकरी मतांची विभागणी होऊ शकते, अशी चर्चा होती. याबाबत आनंदराज आंबेडकर यांना विचारले असता त्यांनी ही शक्यता साफ फेटाळून लावली होती. वंचितच्या कार्यकर्त्यांनीच मला अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची विनंती केली. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलेल्या उमेदवाराबाबत वंचित कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. आंबेडकर या नावाला वलय आहे. त्यामुळे आंबेडकर जेव्हा निवडणुकीत उभे राहतात तेव्हा समाज त्यांच्या मागे असतो असे आनंदराज आंबेडकर याआधी म्हणाले होते.
अमरावतीत पोस्टमार्टम! जालन्यात काँग्रेस, नगरमध्ये लंकेंना साथ? बच्चू कडूंचं सूचक वक्तव्य