अमरावतीत पोस्टमार्टम! जालन्यात काँग्रेस, नगरमध्ये लंकेंना साथ? बच्चू कडूंचं सूचक वक्तव्य

Mla Bachchu Kadu letter to Cm Eknath Shinde

Bacchu Kadu : अमरावतीत मतदारसंघात आमदार बच्चू कडू कमालीचे (Bacchu Kadu) आक्रमक झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत नवनीत राणांचा प्रचार करणार नाही असा इशारा त्यांनी महायुतीतील नेत्यांना दिला आहे. त्यानंतर महायुतीची वाटचाल अधिक कठीण झालेली असताना आणखी एक धक्का देण्याची तयारी बच्चू कडूंनी चालवली आहे. महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांना पाठिंबा देण्याची तयारी त्यांच्याकडून केली जात आहे.

बच्चू कडू यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जालन्यात काँग्रेस आणि नगरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याबाबत सूचक वक्तव्य केले. कडू म्हणाले, मला असं वाटतं की आता अमरावतीचं काही राहिलेलं नाही पोस्टमार्टम झालेलं आहे. फक्त निकाल बाकी आहे आणि तो म्हणजे प्रहारचाच आहे. आम्ही महायुतीत रहावं की नाही हा निर्णय त्यांचा असेल. तो जे निर्णय घेतील त्याचं मी स्वागत करेन. न्यायालयात केस पेंडिंग असतानाही उमेदवारी दिली जाते. या हुकूमशाहीच्या विरोधात आम्ही आहोत.

अमरावतीत महायुतीचं टेन्शन वाढलं! नवनीत राणांविरोधात ‘प्रहार’कडून दिनेश बूब रिंगणात

रवी राणांची जी वागणूक आहे ते अतिशय संतापजनक आहे म्हणून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यामुळे मी स्वतःचा अपमान सहन करेल पण पण कार्यकर्ते म्हणतात की अपमान सहन करण्यापेक्षा आपल्याला युतीच्या बाहेर निघालं तर बरं होईल. आमचा प्रहार पक्ष कायम राहिला पाहिजे म्हणून आम्ही अमरावतीमधून उमेदवार दिला असे स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिले.

आमच्या जिथे ग्रामपंचायत आहे तिथे निधी दिला जात नाहीत तर जो आहे तो काढून घेतला जातो म्हणून आम्हाला आमचे निर्णय घ्यावे लागतील. आमचा पक्ष दिल्लीत आणि मुंबईत चालत नाही गावा खेड्यात चालतो. आम्हाला दिल्ली मुंबईची वारी करायची गरज नाही. जालन्यात काँग्रेसला मदत करावी असं कार्यकर्त्यांचं मत आहे मात्र अजून निर्णय नाही पूर्ण बैठका झाल्यावर निर्णय घेऊ, असे सूचक वक्तव्य बच्चू कडू यांनी केले.

Nilesh Lanke : माझ्यामुळं अजितदादांना खाली पाहण्याची वेळ येणार, लंके नेमकं काय म्हणाले?

प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्ते सांगत आहेत की आम्हाला भरपूर त्रास झाला. काहीजण सांगतात की निलेश लंके चांगले आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्हाला एका निर्णयापर्यंत जावं लागेल असे संकेत बच्चू कडू यांनी दिले.

follow us