Nilesh Lanke : माझ्यामुळं अजितदादांना खाली पाहण्याची वेळ येणार, लंके नेमकं काय म्हणाले?
Nilesh Lanke On Ajit Pawar : पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)राष्ट्रवादी शरद पवार गटात (NCP Sharad Pawar Group)प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. आमदार निलेश लंके हे नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे लपून राहिले नाही. त्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी निलेश लंके यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. असं असलं तरी आमदार निलेश लंके हे नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. अजितदादांना आपल्याविषयी चुकीचा रिपोर्ट मिळाल्याचेही यावेळी निलेश लंके म्हणाले. आपल्यामुळे अजितदादांना महायुतीत खाली पाहण्याची वेळ येणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी बोलून दाखवले. निलेश लंके यानी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
AAP Candidate List : मंत्रीच निवडणुकीच्या रिंगणात; ‘पंजाब’साठी आपकडून 8 उमेदवारांची यादी जाहीर
आमदार निलेश लंके म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमचे नेते आहेत. त्यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाविषयी सविस्तर चर्चा केली आहे. मला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. पण अद्यापपर्यंत मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला नाही. कधीकधी नेतेमंडळींना ग्राऊंडलेव्हलचा खरा रिपोर्ट जात नसतो.
हरिशचंद्र चव्हाणांची घरवापसी? दिंडोरीत भारती पवारांच्या विरोधात पवारांना आठवला जुना कार्यकर्ता…
त्यामुळे आजतरी मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला नसला तरी, अजितदादा आमचे नेते आहेत. नेत्यांना वाटत असतं की, आपल्या कार्यकर्त्याचं नुकसान झालं नाही पाहिजे. दादांकडे आम्ही श्रेष्ठ व्यक्तीमत्व म्हणून पाहात आहोत. अजितदादांनी मला वडिलकीच्या नात्याने आधार दिला आहे. त्यामुळे मतदारसंघाविषयी वडिलकीच्या नात्यातून माझ्याशी बोलले आहेत. पण अद्यापर्यंत कुठली परिस्थिती बदलली नाहीतर पाहू.
समाजाचा जर लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून लोकांचा सहभाग पाहायला मिळाला तर त्यावेळी आपण निर्णय घेऊ असं स्पष्टपणे आमदार निलेश लंके यांनी सांगितले. यावेळी अजितदादा म्हणाले की, निलेश लंके यांची लोकप्रियता ही फक्त पारनेर मतदारसंघापुरतीच आहे.
बाकीच्या मतदारसंघाचं मी त्याला सगळं समजावून सांगितलं आहे. असंही यावेळी अजितदादा म्हणाले आहेत, त्यावर आमदार लंके म्हणाले की, अजिदादांना जी माहिती मिळाली त्याबद्दल दादा बरोबर बोलले आहेत. अजितदादा हे महायुतीचे नेते आहेत. आणि माझ्यामुळे दादांना उद्या खाली पाहण्याची वेळ येणार आहे.
त्यामुळे दादांनी मला सगळं समजून सांगितलं आहे. असं बोलत असतानाच दुसरीकडे आमदार निलेश लंके यांनी आपण निवडणूक लढवण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नसल्याचे सांगितले. आणि पाहू आता पुढं काय होतंय असंही म्हणाले. कधी कधी एखाद्या उमेदवाराबद्दल सकारात्मक गोष्टी असतात पण नेत्यांपर्यंत चुकीच्या गोष्टी पोहोचलेल्या असतात, असेही आमदार निलेश लंके म्हणाले.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आमदार निलेश लंके यांचा शरद पवार गटात जाण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यावरुन अजितदादांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे.
निलेश लंके यांच्या डोक्यात कोणीतरी हवा भरली असल्याचेही यावेळी अजित पवार यावेळी म्हणाले. त्यातच आता भाजपची दुसरी यादी जाहीर झाली त्यात भाजपकडून विद्यमान खासदार सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, त्यामुळे आज आमदार निलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करुन सुजय विखे यांनी कडवी टक्कर देणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.