AAP Candidate List : मंत्रीच निवडणुकीच्या रिंगणात; ‘पंजाब’साठी आपकडून 8 उमेदवारांची यादी जाहीर
AAP Candidate List For Punjab : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने पंजाब मधील (AAP Candidate List) मतदारसंघांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत आठ उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. संगरूर मतदारसंघातून मंत्री मीत हायर यांना उमेदवारी मिळाली आहे. याच मतदारसंघातून मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) खासदार म्हणून निवडून आले होते. या यादीत पक्षाने पाच मंत्र्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. आम आदमी पार्टीने पंजाब सरकारमधील ज्या मंत्र्यांना उमेदवारी दिली आहे त्यात अमृतसर येथून कुलदीप सिंह धालीवाल, खंडूर साहिब मतदारसंघातून लालजित सिंह भुल्लर, संगरूर येथून गुरमित सिंह मीत हायर आणि पटियाला मतदारसंघातून डॉ. बलबीर सिंह यांचा समावेश आहे.
Pune Lok Sabha : “आता ना तक्रार, ना कुणाकडून अपेक्षा”; वसंत मोरेंच्या पोस्टने पुन्हा खळबळ!
या व्यतिरिक्त जालंधर मतदारसंघातून विद्यमान खासदार सुशीलकुमार रिंकू यांना उमेदवारी मिळाली आहे. भटिंडा येथून गुरमित सिंह खुडियां, फतेहगढ येथून गुरप्रित सिंह आणि फरीदकोट लोकसभा मतदारसंघातून करमजीत अनमोल यांना संधी मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाने 11 मार्च रोजी एक मोहिम सुरू केली होती. पंजाब राज्यात लोकसभेच्या 13 जागा आहेत. या सर्व जागांवर आम आदमी पार्टी लढणार आहे. राज्यात काँग्रेसबरोबर आघाडी केलेली नाही. चंदीगड, दिल्ली, हरियाणा, गुजरात आणि गोवा या राज्यांत मात्र दोन्ही पक्षांत आघाडी आहे.
पंजाबात आम आदमी पार्टीच्या विरोधात भाजप आणि शिरोमणी अकाली दल आहेत. अकाली दल आणि भाजपात आघाडीसाठी चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. मात्र अद्याप आघाडीची घोषणा झालेली नाही. आम आदमी पार्टी आणि काँग्रेस स्वतंत्र लढत आहेत. तरी देखील या राज्यात भाजपला फार फायदा होईल अशी स्थिती नाही. या राज्यात भाजपाची ताकद मर्यादीत आहे.