बच्चू कडू नवनीत राणांचं गणित बिघडविणार? राज्यात युती पण अमरावतीत..,

बच्चू कडू नवनीत राणांचं गणित बिघडविणार? राज्यात युती पण अमरावतीत..,

Amravati Loksabha : लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) तारखा जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांच्या राज्यातील मतदारसंघांमध्ये उमेदवारांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्यात एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडी समोरासमोर उभे ठाकले आहेत. अशातच आता महायुतीतील घटक पक्ष प्रहार संघटना (Prahar Sanghatna) अमरावतीत स्वतंत्र उमेदवार उभा करणार असल्याचं समोर आलं आहे. राज्यात प्रहार संघटनेची महायुतीसोबत युती असून अमरावतीत मात्र उमेदवार दिला जाणार आहे. त्यामुळे महायुतीच्या संभाव्य उमेदवार असणाऱ्या विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचं गणित बिघडणार असल्याचं बोललं जात आहे.

Lok sabha Election : सांगलीत विशाल पाटीलच लढत देतील; काँग्रेस ठाकरेंची मनधरणी करणार!

महायुतीकडून अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी खासदार नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. अद्याप राणा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं नसून नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरुन महायुतीतील शिंदे गटासह प्रहार संघटनेकडूनही विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे आता नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरुन विदर्भात चांगलच घमासान सुरु आहे. अशातच आता प्रहार संघटनेकडून उमेदवार दिला जाणार आहे. प्रहार संघटनेकडून दिनेश बुब हे उमदेवार असण्याची शक्यता आहे. दिनेश बुब हे सध्या उद्धव ठाकरे गटाचे अमरावती शहराध्यक्ष आहेत.

“लोकसभा तर ट्रेलर खरा पिक्चर विधानसभेत”; पवारांची साथ मिळताच जानकरांनी भाजपला ठणकावलं

अमरावतीच्या जागेवरुन महाविकास आघाडीमध्येही रस्सीखेच सुरु असल्याचं दिसून येत होतं. काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा म्हंटला होता. त्यावरुन राज्यात वातावरण चांगलच तापलं होतं. त्यावेळी राणा यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याचं गोष्टीमुळे ठाकरे गटाला बदला घ्यायचा या भावनेतून अमरावती लोकसभेची जागा ठाकरे गटाला देण्याच यावी, अशी चर्चा सुरु होती. मात्र, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

श्रेयस तळपदे आणि तुषार कपूरच्या ‘कपकपी’ या आगामी थ्रिलर सिनेमाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

दरम्यान, राज्याती लोकसभेचं वातावरण तापलेलं असताना अमरावतीच्या जागेवरुन अद्याप महायुतीकडून निर्णय घेण्यात आलेला नाही, मात्र, काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौरा केला यावेळी त्यांनी अमरावतीची जागा भाजपकडेच असून अमरावतीतून भाजपचाच उमेदवार दिला जाणार असल्याचं स्पष्ट सांगितलं होतं. नवनीत राणा यांनी मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चोख भूमिका मांडली असल्याचंही सूचक विधान फडणवीसांनी केलं होतं. फडणवीसांचं विधान आणि प्रहार संघटनेकडून होत असलेल्या हालचाली पाहता एकंदरी लोकसभा निवडणूकीत अमरावतीतून महायुतीचा उमेदवारी कोणाला मिळणार? नवनीत राणा यांचं गणित बच्चू बिघडवणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube