Women’s Reservation : 60 वर्षांत महिलांचा फक्त मतदानासाठी वापर; नवनीत राणा काँग्रेसवर जळजळीत टीका…
Women’s Reservation : काँग्रेसने मागील 60 वर्षांत महिलांचा फक्त मतदानासाठीच वापर केला असल्याची जळजळीत टीका खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांनी व्यक्त केली आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात आज महिला आरक्षण विधेयकावर चर्चा झाली. यावेळी चर्चेदरम्यान, नवनीत राणा यांनी काँग्रेसवर चांगल्याचं भडकल्याचं पाहायला मिळाल्या आहेत.
Women Reservation Bill : ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाला ओवैसीचा विरोध का? कारण आले समोर
नवनीत राणा(Navneet Rana) म्हणाल्या, संसदेच्या सभागृहा अनेक महिला खासदार आहेत, संसदेपर्यंत पोहोचलेल्या महिलांनी संघर्ष करुन इथपर्यंत पोहोचल्या आहेत. काँग्रेसने आज महिला आरक्षणाच्या विधेयकाला समर्थन दिलं, पण मागील 60 वर्षांत काँग्रेस हे बिल मंजूर का करु शकले नाहीत? याचं उत्तर दिलं पाहिजे, असं राणा म्हणाल्या आहेत.
NCP News : ‘पडळकरांना जोडे मारा, एक लाख मिळवा’; अजित पवार गटाची घोषणा
तसेच देशात मागील 9 वर्षात मोदी सरकार सत्तेत आले आहे, मागील 9 वर्षांत अनेक महत्वाचे विधेयके मंजूर झाली आहेत, आजही महिला आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं आहे. आज देशभरातील सर्व महिला ऐकत आहेत की, मोदींनी महिलांचा फक्त मतदानासाठी वापर केला नाही तर महिलांना अधिकारही दिला असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.
Women’s Reservation Bill लागू झाल्यावर महाराष्ट्रात 16 महिला खासदार तर विधानसभेत किती महिला असणार?
दरम्यान, आजपर्यंत महिलांचा वापर फक्त राजकीय व्यासपीठावरच झाला असून महिलांना अधिकार देण्याचं कोणीही कधी म्हटलं नाही, मात्र मोदी सरकारने आज महिलांना त्यांचा अधिकार दिला असून काँग्रेसला महिलांविषयी प्रेम विश्वास आहे तर याआधी त्यांनी महिलांवर विश्वास का नाही दाखवला? या शब्दांत राणा यांनी काँग्रेसवर बोचरी टीका केली आहे.
Constitution House : जुन्या संसद भवनाला मिळाले नवीन नाव; PM मोदींनी केली मोठी घोषणा
महिला आरक्षणासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले. महिलांना आरक्षण देण्यासंदर्भातील नारीशक्ती वंदन विधेयक मंगळवारी लोकसभेत मांडण्यात आले होते. या विधेयकावर संपूर्ण दिवसभर चर्चा झाल्यानंतर चिठ्याद्वारे मतदान झाले. आरक्षणाच्या बाजूने 454 खासदारांनी पाठिंबा दिला तर विरोधात 2 खासदारांनी मतदान केले.त्यामुळे महिला आरक्षण बहुमताने मंजूर झाले आहे.
लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के जागा देणारे महिला आरक्षण विधेयक उद्या राज्यसभेत मांडले जाणार आहे. राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतीकडे मंजूरीसाठी पाठवले जाईल. यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल.