PM Narendra Modi in Yavatmal : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी यवतमाळमध्ये (PM Narendra Modi) येणार आहेत. लोकसभा निवडणुका अगदी (Lok Sabha Election) जवळ येऊन ठेपलेल्या असताना मोदींच्या या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. आजच्या दौऱ्यात मोदींच्या उपस्थितीत भव्य मेळावा पार पडणार आहे. विविध विकासकामांचे लोकार्पण मोदी करणार आहेत. या दौऱ्याची जय्यत तयारी स्थानिक प्रशासन आणि नेतेमंडळींनी केली आहे. दुसरीकडे विरोधी पक्षांनी मात्र या दौऱ्यावरील खर्चावरून जोरदार टीका केली आहे. मोदींच्या एका दिवसाच्या दौऱ्यासाठी मंडप उभारणी आणि अन्य कामांसाठी तब्बल 12 कोटी 73 लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याची बाब महाराष्ट्र काँग्रेसने (Maharashtra Congress) उघडकीस आणली आहे.
याबाबत काँग्रेसने फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एक दिवसाच्या कार्यक्रमासाठी 12 कोटी 73 लाख रुपयांचा खर्च जनतेच्या पैशांतून केला जात असेल तर ही पैशांची उधळपट्टी नाही का, असा सवाल काँग्रेसने विचारला आहे.
PM मोदींसाठी ‘यवतमाळ’ ठरते लकी : सलग तिसऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (28 फेब्रवारी) यवतमाळ दौऱ्यावर आहेत. आजच्या दौऱ्यात मोदींच्या उपस्थितीत भव्य महिला मेळावा पार पडणार आहे. यासोबतच वरोरा वणी महामार्गावरील 18 कि.मी. चौपदरीकरण कामाचे लोकार्पण, सलाईखुर्द तिरोरा महामार्गाविरील 42 कि.मी. काँक्रिटीकरण रस्त्याचे लोकार्पण, साकोली – भंडारा जिल्हा सीमेपर्यंतच्या 55.80 कि.मी. दुपदरी रस्त्याचे लोकार्पण, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील सहा प्रकल्पांचे लोकार्पण, बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील 45 सिंचन प्रकल्पांचे लोकार्पण अशा विविध विकास कामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडणार आहे.
26 एकरवर भव्य मंडप
लोकसभा निवडणुकांआधी पंतप्रधान मोदी यवतमाळमध्ये येत आहेत. येथे त्यांच्या उपस्थितीत भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या पुढाकारातून हा मेळावा होत आहे. प्रशासकीय यंत्रणेने या कार्यक्रमाची जोरदार तयारी केली आहे. दोन लाख महिला या मेळाव्याला उपस्थित राहतील असा अंदाज आहे. 43 एकर जागेवर सभा होणार असून यातील 26 एकरवर मंडप उभारण्यात आला आहे.
मोठी बातमी : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना PM मोदींचे गिफ्ट : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर FRP मध्ये वाढ