Download App

यवतमाळ शून्यावर पण, येथूनच मिळणार पहिला आमदार; सावंतांचा ठाकरेंना शब्द

Arvind Sawant : सामान्य माणसाला असामान्य बनविणारी कोणती संघटना असेल तर ती शिवसेना आहे. ज्यांना मोठं केलं ते आज तिकडे गेले आणि भ्रष्टचाराने बरबटले. तुम्ही मात्र सोबत राहिलात तुम्हाला मी आज दंडवत घालतो. आता एकच लक्षात ठेवा यवतमाळ जिल्हा शून्यावर आला. ना आमदार आहे ना खासदार आहे. आता तुम्हा शिवसैनिकांच्यावतीनं उद्धवजींना सांगतो निश्चिंत राहा. बाजूला संजय देशमुख बसलेत. निव्वळ प्रवेश करून नाही बसलेत तर तुम्हाला या यवतमाळमधून पहिला आमदार संजय देशमुख दिसतील, असा शब्द शिवसेनेचे (उबाठा) खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

शिवसेनाप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याचे दौरे सुरू केले आहेत. उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज त्यांची जाहीर सभा यवतमाळ येथे पार पडली. या सभेत बोलताना खासदार सावंत यांनी भाजपवर जोरदार प्रहार केले.

‘मी तर आमदारकी सोडायलाही तयार होतो’; वळसे पाटलांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर

ते पुढे म्हणाले, मुघलांना जसे पाण्यातही संताजी धनाजी दिसायचे तसेच आता भाजपला फक्त उद्धव ठाकरेच दिसत आहेत. त्याचं कारण आहे की नाव काढून घेतलं. चिन्हा काढून घेतलं पण ही जनता ते कशी काढून घेणार. ही सगळी जनता आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबरोबर आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे (उबाठा) खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

सामान्य माणसाला असामान्य बनविणारी कोणती संघटना असेल तर ती शिवसेना आहे. ज्यांना मोठं केलं ते आज तिकडे गेले आणि भ्रष्टचाराने बरबटले. तुम्ही मात्र सोबत राहिलात तुम्हाला मी आज दंडवत घालतो. आता एकच लक्षात ठेवा यवतमाळ जिल्हा शून्यावर आला. ना आमदार आहे ना खासदार आहे. आता तुम्हा शिवसैनिकांच्यावतीनं उद्धवजींना सांगतो निश्चिंत राहा. बाजूला संजय देशमुख बसलेत. निव्वळ प्रवेश करून नाही बसलेत तर तुम्हाला या यवतमाळमधून पहिला आमदार संजय देशमुख दिसतील, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.

आता थेट पळवापळवी – ठाकरे

पूर्वी पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळवून नेत असल्याची टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय. दरम्यान, आधी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यानंतर आता राष्ट्रवादीतही अजित पवारांना बंड केल्याने पक्ष पळवून नेला.

अजितदादांनी बंड केलं पण, पडद्यामागं काय शिजलं? चव्हाणांनी केला धक्कादायक खुलासा

महाराष्ट्राला फोडाफोडी राजकारण नवीन नाही, पूर्वी पक्ष फोडला जायचा आता पळवून नेत आहेत. तरीदेखील आम्हाला जनतेतून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. विरोधकांचा फोडाफोडीचा पायंडा महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी वाईट असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केली.

Tags

follow us