Download App

कॉंग्रेसने विदर्भ गमावला! 62 पैकी 50 जागांवर महायुतीचं वर्चस्व, दिग्गजांचा पराभव..

विदर्भातील एकूण 62 विधानसभा मतदारसंघापैकी महायुतीला 50 जागा मिळाल्या आहेत. एकट्या भाजपला 39, शिंदे गटाला 4 तर अजित पवार गटाला 6 जागा मिळाल्या

  • Written By: Last Updated:

Vidhansabha Election Result 2024 : आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election Result) निकालात भाजप-महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे. तब्बल 200 हून अधिक जागांवर महायुतीला आघाडी मिळाली. एकट्या विदर्भात महायुतीला 50 जागा मिळाल्या आहेत.

Wayanad By-Election Result: वायनाडमधून प्रियंका गांधींची राजकीय इनिंग सुरु, 4 लाख मतांनी विजयी 

विदर्भात महायुतीला 50 जगाा
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात 10 पैकी 2 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने 7 जागा जिंकल्या होत्या. मात्र, विधानसभेला विदर्भात महायुतीने मुसंडी मारली आहे. विदर्भातील एकूण 62 विधानसभा मतदारसंघापैकी महायुतीला 50 जागा मिळाल्या आहेत. एकट्या भाजपला 39, शिवसेना शिंदे गटाला 4 तर अजित पवार गटाला 6 जागा मिळाल्या आहेत. युवा स्वाभिमान पक्षाला एक जागा मिळाली.

महाविकास आघाडीला 12 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस 8, शिवसेना युबिटी- 4, राष्ट्रवादी शरद पवार गटाला एकही जागा मिळाली नाही.

विदर्भात कोणाचा पराभव?
यशोमती ठाकूर
कॉंग्रेसच्या फायरब्रॅंड नेत्या यशोमती ठाकू यांना पराभवला सामोरे जावे लागले. तिवसा विधानसभा मतदारसंघात यशोमती ठाकूर यांच्या विरोधात भाजपने राजेश वानखेडे यांना उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात यशोमती ठाकूर या विजयासाठी प्रबळ दावेदार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र 21 फेऱ्यांनंतर राजेश वानखेडे यांना 8195 मतांची आघाडी होती. अखेर यशोमती ठाकूरांचा पराभव झाला. त्यांचा 7 हजार 974 मतांनी पराभव झाला.

Assembly Election Result : लाडक्या बहिणींची कमालच! उत्तर महाराष्ट्रात दिली एकहाती ‘सत्ता’… 

अनुजा केदार
सावनेर मतदारसंघात कॉंग्रेसकडून सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा यांनी निवडणूक लढवली, तर त्यांच्या विरोधात भाजपकडून आशिष देशमुख रिंगणात होते. अंतिम फेरीत आशिष देशमुखांनी 1 लाख 18 हजार 906 मते मिळवत विजय मिळवला. त्यांनी अनुजा केदार यांचा 26 हजार 522 मतांनी पराभव केला.

यशोमती ठाकूर यांच्यासोबत डॉ. सुनील देशमुख, बच्‍चू कडू, राजेंद्र शिंगणे,  सलील देशमुख यांनाही पराभवाचा हादरा बसला आहे.

महायुतीच्या विजयाची कारणे…
महायुती सरकारने महिलांसाठी आणलेली लाडकी बहीण योजना विदर्भात निर्णायक ठरली. महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये मिळाल्याने महिलांनी महायुतीला कौल दिला. याशिवाय पीएम मोदी, गृहमंत्री अमित शाह, योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारसभांमुळे मतदारांवर प्रभाव पडून मतदार महायुतीच्या बाजूने गेले.
संघाचे सहकार्य, भापजच्या अन्य विंग्ज आणि फडणवीस यांचं सुक्ष्म नियोजन तसेच त्यांची मेहनत या देखील महायुतीच्या विजयातील महत्वाच्या बाबी आहेत.

याशिवाय, ज्येष्ठांसाठी, युवकांसाठी स्टायपेंड अशा वेगवेगळ्या योजना आणल्या. शेतकऱ्यांना वीज बिल माफी दिली, त्याचा मतदारांवर परिणाम विदर्भातील मतदारांवर झाला. परिमाणी मतदारांनी महायुतीला कौल दिला.

follow us