Download App

Amravati Graduate Constituency : मविआचे धीरज लिंगाडे आघाडीवर; भाजपच्या उमेदवाराला टाकलं मागे

अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमदेवार धीरज लिंगाडे 2 हजार 373 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांना 41 हजार 27 मते मिळाली आहेत.

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मविआचे धिरज लिंगाडे 2378 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे रणजित पाटील चौथ्या फेरीतही पिछाडीवर पडले आहेत. चौथ्या फेरीत धिरज लिंगाडे यांना 43340 मते भाजपचे रणजित पाटील यांना 41027 मते मिळाली आहेत.

अद्याप मतमोजणी सुरु असल्याची माहिती मिळत असून चुरशीच्या लढतीत अवघ्या 2 हजार 373 मतांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे आघाडीवर असून लिंगाडे यांना 43 हजार 340 मते मिळाली आहेत.

या निकालामध्ये एकूण 1 लाख 2 हजार 587 मतांपैकी एकूण 8 हजार 735 मते अवैध ठरल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे रणजित पाटील यांच्या प्रतिनिधींनी अवैध मतांची फेरतपासणी व्हावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य केल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली असून मतमोजणी अधिकाऱ्यांकडून एकूण 10 टेबलांवर फेरतपासणी सुरु आहे. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालाबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता लागलीय.

या निवडणुकीसाठी एकूण ४९.६७ टक्‍के मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला होता. पहिल्‍या पसंतीच्‍या मतमोजणीत कोटा पूर्ण न झाल्‍यास निकालाला आणखी विलंब होण्‍याची शक्यता आहे. मतमोजणीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Tags

follow us