Nitin Gadkari speak On sharad Pawar : गुणवत्ताधारकांच्या पाठिशी उभं राहणारं महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) असल्याचं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शरद पवारांवर कौतुकाचा वर्षाव करीत गुपित उलगडलं आहे. दरम्यान, अमरावतीत आज डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारकडून 125 रुपयांचं नाणं जारी करण्यात आलं आहे. यावेळी पंजाबराव देशमुख पुरस्काराने शरद पवारांना सन्मानित करण्यात आलं आहे. यावेळी ते बोलत होते.
शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी! सेन्सेक्स अन् निफ्टीनं गाठला ऑल टाईम हाय…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, कृषी क्षेत्रात डॉय पंजाबराव देशमुख यांचं नाव मोठं आहे. पंजाबराव देशमुखांच्या नावे देण्यात येणार पुरस्कार शरद पवारांना देण्यात आलायं. शरद पवार यांचही नाव मोठंच आहे. आता या पुरस्काराने आणखी मोठी उंची गाठली आहे, शरद पवार यांच्या उंचीची माणसं दरवर्षी कुठं मिळणार? असा मिश्किल अंदाजात सवाल करीत नितीन गडकरींनी पवारांचे गोडवे गायले आहेत.
तसेच पंजाबराव देशमुखांसारखीच तळमळ, व्हिजन शरद पवारांकडे असून अनेकदा राजकीय धुळवड सुरूच असते. मात्र, या राजकीय धुळवडीत डॉ. पंजाबराव देशमुख, शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांची नावे, त्यांच कार्य सर्व सामान्यांच्या कायम लक्षात राहतं. देशासह राज्यातील अनेक क्षेत्रांमध्ये गुणवत्ता असलेल्यांच्या पाठिशी शरद पवार उभे राहिलेत. त्यांनी कोणताही पक्षीय अभिनिवेश बाळगला नसल्याचा उल्लेखही यावेळी मंत्री गडकरींनी आवर्जून केला आहे.
Dunki Flight : ‘डंकी फ्लाइट’चा मास्टरमाइंड कोण? पडद्यामागची स्टोरीही तितकीच थरारक
शरद पवार महाराष्ट्राचं नेतृत्व :
आपण राजकारणाचा अर्थ सत्ताकारण असा घेतलायं हे दुर्देव. राष्ट्रकारण, समाजकारण, विकासकारण धर्मनीती म्हणजेच राजकारण होयं. क्रीडा, कृषी, शिक्षण, सांस्कृतिक कला क्षेत्रातील गुणवत्ताधारकांच्या पाठिशी उभं राहणारं महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणजे शरद पवार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत.
देशमुखांनी शिक्षणाचं जाळं निर्माण केलं :
पंजाबराव देशमुख यांनी विदर्भात अनेक ठिकाणी शिक्षणाचं जाळं निर्माण केलं आहे. आज आपल्यासमोर एक म्हणजे शिक्षण क्षेत्र अन् दुसरं म्हणजे कृषी क्षेत्र आहे. यामध्ये होणारी गुंतवणूक हे भविष्यातील नागरिकांसाठी निर्माण होणारी भांडवली व्यवस्था निर्माण करीत आहे. समाजातल्या शेवटच्या तळागाळातल्या माणसापर्यंत शिक्षणाचं सार्वत्रिकरण व्हावं म्हणून शैक्षणिक मुल्यांच्या आणि शिक्षणाच्या माध्यमातून संस्कृती अर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावा, ही संकल्पना पंजाबराव देशमुखांनी मांडल्याचं नितीन गडकरींनी अधोरेखित केलं आहे.
दरम्यान, गावच्या शेतकऱ्याच्या विकासासाठी देशमुखांनी अनेक कार्य केली आहे. शेती प्रगत नव्हती तेव्हा देशमुखांनी शेतकऱ्यांच्या विकासाचा वसा घेतला. राजकारणातील माणूस पाच वर्षांसाठीच विचार करतो पण पंजाबराव देशमुखांनी भविष्याचा केला असल्याचंही गडकरी म्हणाले आहेत.