Nagpur News : पटोले-वडेट्टीवारांसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

नागपूर : काँग्रेसच्या बैठकीदरम्यान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांच्यासमोर तुफान राडा झाला आहे. नागपूरमध्ये आयोजित लोकसभेच्या आढावा बैठकीदरम्यान हा वाद झाला आहे. पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेतेसमोर असताना अशाप्रकारे राडा झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून, या राड्याचे व्हिडिओ सोशल मीाडियावर व्हायरल होत असून यात नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे […]

WhatsApp Image 2023 10 12 At 1.45.40 PM

WhatsApp Image 2023 10 12 At 1.45.40 PM

नागपूर : काँग्रेसच्या बैठकीदरम्यान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांच्यासमोर तुफान राडा झाला आहे. नागपूरमध्ये आयोजित लोकसभेच्या आढावा बैठकीदरम्यान हा वाद झाला आहे. पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेतेसमोर असताना अशाप्रकारे राडा झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून, या राड्याचे व्हिडिओ सोशल मीाडियावर व्हायरल होत असून यात नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि नरेंद्र जीचकार यांच्यात हा राडा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी आढावा घेतला जाणार होता. या बैठकीत नागपूरच्या सहा मतदार संघांचा आढावा घेतला जाणार होता. पण भाषण करण्यावरून विकास ठाकरे आणि नरेंद्र जीचकार यांच्यात वाद झाला. या राड्यावेळी मंचावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्यासह काँग्रेसचे माजी मंत्री, आमदार स्थानिक नेते उपस्थित होते.

विजय वडेट्टीवार बैठकीला कसे?
राडा सुरू होण्यापूर्वी बैठकीच्या ठिकाणी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवर दाखल झाले होते. यावेळी वडेट्टीवर यांनी दोन दिवसांपूर्वी राहुल गांधीबाबत विधान केले. त्यावरून एका कार्यकर्त्याने राहुल गांधी यांच्यावरील विधानानंतरही तुम्ही इथे कसे असा प्रश्न विचारला. यानंतर गोंधळाला सुरूवात झाली.

यावेळी जिचकर यांनी मंचावर जात वडेट्टीवर यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असता विकास ठाकरे आणि जिचकर यांच्या माईकवर बोलण्यावरून वाद झाला. घडलेल्या या घडनेमुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला असून पटोले आणि वडेट्टीवर यांच्यासमोर काही कार्यकर्त्यांनी एकमेकांची कॉलर पकडण्यापासून ते खूर्च्या फेकल्यानेदेखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Exit mobile version