Download App

प्रेम, लग्न अन् धोका…लुटेरी दुल्हनचा ‘लव्ह गेम’

या महिलेने केवळ दोन-चार नव्हे… तर आठ लग्नं केलीत. ती कोण आहे? ती पुरुषांना कशी जाळ्यात अडकवत होती? आणि शेवटी... तिचा 'लव्ह गेम' उघडकीस कसा आला?

  • Written By: Last Updated:

Nagpur woman marries 8 men cheats lakhs fatima arrested: गुलाबासारखे ओठ… पाणीदार डोळे… गालावर निरागस स्मित हास्य. फोटोमध्ये दिसणारी ही स्त्री, पहिल्यांदा पाहाल, तर वाटेल ‘हीच खरी संस्कारी स्त्री’…’घरची लक्ष्मी’ समजलात, तीच निघाली घर लुटणारी चेटकीण. तिच्या हसऱ्या चेहऱ्याच्या मागे लपलंय एक थरारक गूढ. तिने लग्नाच्या नावाखाली भयंकर खेळ खेळला… हो, या महिलेने केवळ दोन-चार नव्हे… तर आठ लग्नं केलीत. ती कोण आहे? ती पुरुषांना कशी जाळ्यात अडकवत होती? आणि शेवटी… तिचा ‘लव्ह गेम’ उघडकीस कसा आला? जाणून घेऊ..

समीरा फातिमा पुरुषांना कशी अडकावायची ?
पुरुषांना फसविणाऱ्या महिलेचं नाव… समीरा फातिमा. ती उच्चशिक्षित असून, नागपूरमध्ये शिक्षिका म्हणून ही तिने नोकरी केलीय. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लिम धर्माचाच पुरुषाशी ओळख निर्माण करायची. तिचे शिक्षण, नोकरी हे ती सर्व समोरच्याला सांगायची. पुरुषांचा विश्वास संपादन करायची. मी पतीपासून घटस्फोट घेतलाय. मला आधार द्या, मी तुमची दुसरी पत्नी म्हणून जगेल, असं ती सांगत असे. तिच्यावर विश्वास ठेवून अनेकांनी तिच्याशी निकाह म्हणजेच लग्न केलं. बरं ती लग्न ही… व्यावसायिक, पैशावाल्या लोकांसोबतच करायची. (Nagpur woman marries 8 men cheats lakhs fatima arrested)

एखाद्याने लग्न करायला नकार दिला, तर त्याच्या घरात घुसून बळजबरी करून लग्न करायची. त्यावेळी ती आई-काका-काकू हे आपले नातेवाईक सुद्धा सोबत आणत होती. काझी आणून रितसर निकाहनामा करायची. त्यानंतर महिना, दीड महिन्यानंतर पतीशी भांडण करत… पैशासाठी ब्लॅकमेल करायला सुरुवात करायची. पैसे न दिल्यास थेट गुन्हा दाखल करण्याची धमकी द्यायची. कोर्टात दावा दाखल करत होती. बदनामीमुळे या महिलेला पुरुष लाखो रुपये देऊन टाकायचे.

पठाण नावाच्या व्यक्तीची तक्रार अन् फुटलं भांड
2023 मध्ये तिने पठाण नावाच्या व्यक्तीला सुद्धा असंच फसवलं होते. त्याच्याशी घरात घुसून जबरदस्तीने लग्न केलं. त्यानंतर महिन्याभरात त्याच्याशी भांडणं केलं अन् पैसे मागू लागली. त्यानेही काही पैसे तिला दिले. पण समीरा त्यानंतर सुद्धा ब्लॅकमेल करत होती. वैतागलेल्या पठाण आडनावाच्या व्यक्तीने समीरा फातिमाविरोधात गिट्टीखदान पोलिसांत तक्रार दिली. परंतु समीरा काही सापडली नाही. तब्बल दीड वर्ष ती फरार होती. परंतु तीन दिवसांपूर्वी समीरा फातिमा ही नागपूरमधील सिव्हिल लाइन्स येथे आली होती. तिथील एक टपरीवर चहा पिण्यासाठी जात असताना पोलिसांनी तिला पकडले. पोलीस चौकशीत या महिलेने अनेक जणांना याच पद्धतीने फसवलं असल्याचे. एक-दोन नाही तर आतापर्यंत तब्बल आठ जणांना फसविल्याचे पुरावेच पोलिसांच्या हाती लागले.

आई, काका, काकू अन् बळजबरीचा निकाहनामा
ही महिला 2010 पासून अनेक विवाहित पुरुषांशी दुसरे लग्न करून फसवत होती. यात तिला तिची आई, काका-काकू हे सुद्धा साथ द्यायचे. ती लग्न करताना निकाहनामाही लिहून घेत असतं. परंतु लग्न मोडताना खुलानामा करत नव्हती, म्हणजेच त्यांचा तलाक होत नव्हता. त्यानंतर दुसरं लग्न करायची. तिच्याविरुद्ध तीन जणांनी गुन्हा फसवणुकीचा गुन्हा नोंदवल्याची गट्टीखदान पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक शारदा भोपाले यांनी सांगितलंय. त्यामुळे मंडळी सोशल मीडियावरून एखाद्या अनोळखी महिला, मुलगी यांच्याशी चॅटिंग करताना साधव राहा. नाहीतर तुमच्यामागे एखादे लचांड लागेल.

follow us