Rahul Gandhi : कॉंग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महारॅलीला संबोधित केलं. यावेळी राहुल गांधी भाजपवर जोरदार निशाणा साधला. राहुल म्हणाले की, देशात विचारसरणीची लढाई सुरू आहे. तर भाजपमध्ये गुलामी आणि राजेशाही प्रमाणे कारभार चालतो. यावेळी त्यांनी एका भाजप खासदाराची भेटीचा किस्सा देखील सांगितला. तसेच नाना पटोले यांनी मोदींना प्रश्न विचारला म्हणूनच त्यांना पक्षातून काढलं. असंही राहुल म्हणाले.
पंचवीस वर्षे आमदारकी उपभोगली पण निळवंडेचा प्रश्न सोडवू शकले नाही, कर्डिलेंचा थोरातांना टोला
काँग्रेसचा आज 28 डिसेंबर रोजी 139 वा स्थापना दिवस साजरा केला जात आहे. हा कार्यक्रम नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून ‘है तयार हम’ ही महारॅली काढण्यात आली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी राहुल गांधी बोलत होते. यावेळी त्यांनी एक भाजप खासदार गुपचूप भेटल्याचा दावा केला. त्याने भाजपमध्ये राजेशाही चालत असल्याचं सांगितल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत.
भारताच्या प्रयत्नांना मोठे यश, कतारमधील नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा रद्द
राहुल गांधी म्हणाले की, ‘देशात विचारसरणीची लढाई सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मला भाजपचे एक खासदार लपून-छपून भेटले होते. ज्याप्रमाणे भाजपमध्ये असलेले अनेक खासदार पूर्वी काँग्रेसमध्ये होते. तसेच ते देखील होते. मात्र ते मला भेटले त्यांनी मला सांगितलं की, भाजपमध्ये माझी घुसमट होत आहे. माझं शरीर भाजपमध्ये आहे. मात्र माझं मन हे काँग्रेसमध्ये आहे. कारण भाजपमध्ये गुलामी चालते. जे वरून सांगितलं जातं तेच करावं लागतं. आमचं कोणी ऐकत नाही. राजेशाही प्रमाणे भाजपमध्ये कारभार चालतो.
पुढे राहुल म्हणाले की, त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारलेला आवडत नाही. असाच प्रश्न नाना पटोले हे भाजपमध्ये असताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारला होता. पटोलेंनी विचारलं होतं की, जीएसटीमध्ये शेतकऱ्यांचा वाटा काय असणार? त्यामुळेच त्यांना भाजपमधून काढून टाकण्यात आलं असा आरोप देखील यावेळी राहुल गांधी यांनी केला.