Rajkumar Patel Will Join Shiv Sena : प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार राजकुमार पटेल (Rajkumar Patel) हे प्रहारमधून बाहेर पडणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. दरम्यान, आता राजकुमार पटेल येत्या 10 ऑक्टोबर रोजी शिवसेनेच्या (Shiv Sena) शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. पटेल यांनी रविवारी धारणी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत ही घोषणा केली. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
मी सांगितलेली कामे करुन दाखवा; सुजय विखेंचं लंकेंना खुलं चॅलेंज
राजकुमार पटेल यांनी रविवारी धारणी येथील बालाजी मंगलम हॉलमध्ये कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी बोतलांना पटेल म्हणाले, सर्व कार्यकर्त्यांची तयार असेल तर येत्या 10 सप्टेंबरला प्रवेशासाठी सज्ज व्हा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आपची चर्चा झाली आहे. त्यांच्या नेतृत्वात आपल्याला विकासाचा मार्ग गाठायचा आहे.
Video : आता अयं…अयं..चालू द्या; मंचावरच विखेंनी निलेश लंकेंची नक्कल केली
आता बच्चू कडू यांचा एकुलता एक आमदारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. पटेल हे 10 तारखेला धारणी येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पटेल यांनी आज आयोजित केलेल्या बैठकीच्या निमंत्रण पत्रिकेवर प्रहार पक्षाचे नाव, चिन्ह आणि बच्चू कडू यांचे छायाचित्र नव्हते. केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राजकुमार पटेल आणि त्यांचे पुत्र रोहित पटेल यांची छायाचित्रे होती.
दरम्यान, या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार बच्चू कडू यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली आहे. ते म्हणाले, भाजप-सेनेची ही खेळी आहे. राजकुमार पटेल यांच्यासह अजूनही दोन-तीन महत्त्वाचे कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या विचारात असल्याचे मला समजले आहे. ते टाळता येत नाही, पण आम्हला लढण्याची सवय झालेली आहे. आधी एकटाच होतो, आता एकटे राहू आणि पुन्हा एकाचे दहा करण्याची ताकद बच्चू कडूंमध्ये आहे.
पुढं ते म्हणाले, भाजप-शिवसेना जी खेळी खेळत आहेत, त्याचा फटका त्यांना विदर्भात बसेल. प्रत्येकाचा राजकीय स्वार्थ असतो, त्यामुळे राजकुमार पटेल हे पक्ष सोडून जात असतील तर त्याची आम्हाला पर्वा नाही. त्यांनी सुखात राहावे. त्यांच्याशी मैत्री कायम ठेवून त्यांच्या विरोधात उमेदवार देऊ, असं कडू म्हणाले.
शिंदेंना परिणाम भोगावे लागणार…
एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिले, त्याचे ऋण कायम आहे. मात्र शिंदे गटाने आम्हाला तोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला आम्ही व्यवस्थित उत्तर देऊ, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा कडू यांनी दिला.