मी सांगितलेली कामे करुन दाखवा; सुजय विखेंचं लंकेंना खुलं चॅलेंज

मी सांगितलेली कामे करुन दाखवा; सुजय विखेंचं लंकेंना खुलं चॅलेंज

Sujay Vikhe On Nilesh Lanke : माझ्या विरोधात मतदान टाकणारा माणूस देखील आज काम करावं तर सुजय विखेंनीचं करावा असं म्हणत आहे मात्र आज फक्त भाषण होत आहे. ऐ..ऐ.. अन् चालू द्या अशी टीका नगरचे माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी आज वांबोरीत (Vambori) एका कार्यक्रमात बोलताना खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यावर केली. तसेच तुम्ही निवडून दिलेल्या खासदारांने मी सांगितलेली कामे करुन दाखवावी, असं आव्हान देखील यावेळी सुजय विखे यांनी खासदार निलेश लंके यांना दिले.

सुजय विखे आज वांबोरीत वांबोरी चारी प्रकल्प टप्पा 2 चे भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डीलेसह आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना सुजय विखे म्हणाले की, निवडणुकीत ज्या लोकांनी माझ्या विरोधात मतदान केलं ते लोक देखील काम करावं तर सुजय विखेंनचं करावा असं म्हणत आहे मात्र आज फक्त भाषणे होत आहे. ऐ..ऐ.. अन् चालू द्या. योग्य डॉक्टर योग्य आजाराला मिळाला योग्य पेशेंट मिळाले. आता सर्वांनी आनंदाने पुढे जाऊ, अशी टीका देखील कार्यक्रमात बोलताना त्यांनी केली.

तसेच विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार आलं तर मी तुम्हाला शब्द देतो मुळा धरणामध्ये पाच टीएमसी पाणी जरी उरलं तरीही वांबोरीसाठी चालत राहील असा शब्द देखील यावेळी माजी खासदार सुजय विखे यांनी वांबोरीकरांना दिला. तसेच येणाऱ्या काळात वांबोरीसाठी अनेक विकासाचे कामे होणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी या कार्यक्रमात बोलताना दिली.

पुढे बोलताना सुजय विखे म्हणाले की, मी स्वप्न पाहिले होते की आयुष्यभर शेतकऱ्याला शेतीचं बिल नाही आलं पाहिजे हे स्वप्न सुजय विखेने पाहिलं होतं मात्र माझ्या पराभवाने मला काही नुकसान झालं नाही पण हे स्वप्न भंग झालं. तसेच मी सांगितलेली कामे तुम्ही निवडून दिलेल्या प्रतिनिधीने करून दाखवं असं आव्हान देखील सुजय विखे यांनी यावेळी खासदार निलेश लंकेंना दिले.

मोठी बातमी! गाझातील मशीदी अन् शाळांवर इस्रायलचा हवाई हल्ला, 24 जण ठार

तसेच सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल करण्यासाठी वास्तविक्तेमध्ये जगणं महत्वाचे असते असं देखील ते म्हणाले. ज्या भागाने विखे पाटील कुटुंबाला इतकं दिले त्या भागाला आपण काहीतरी देणं लागते या भावनाने काम करणारा मी आहे असेही या कार्यक्रमात बोलताना सुजय विखे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube