Download App

Amravati politics : पहिल्या फेरीत रणजीत पाटील पिछाडीवर; भाजपसाठी नामुष्की

अमरावती : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. प्रथम फेरीत महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे 680 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना 11 हजार 992 मते मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांना ११ हजार ३१२ मते मिळाली आहेत. महाविकास आघाडीचा उमेदवार 680 मतांनी पुढे आहे.

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात भाजप आणि महाविकास आघाडीत अटी-तटीची लढत सुरु आहे. भाजपसाठी ही निवडणूक चुरशीची मानली जात आहे. या निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी उत्सुकता लागली आहे.

या निवडणुकीची मतमोजणी बडनेरा मार्गावरील नेमाणी गोडाऊन इथे सुरु आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील, काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्‍यासह २३ उमेदवारांचा फैसला आज होणार आहे.

निवडणुकीसाठी गेल्‍या ३० जानेवारीला मतदान झाले होते. निवडणुकीसाठी एकूण ४९.६७ टक्‍के मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. विधानपरिषदेच्या या जागांसाठी पसंतीक्रमाने मतदान करण्यात येते. पहिल्‍या पसंतीच्‍या मतमोजणीत कोटा पूर्ण न झाल्‍यास निकालाला विलंब होण्‍याची शक्यता आहे. मतमोजणीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मतमोजणीसाठी २८ टेबलांची व्‍यवस्‍था करण्‍यात आली असून एकूण २८ पथकांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. दुपारी ३ वाजता मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. या फेरीत भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांना ११ हजार ३१२ मते मिळालीत तर महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांना ११ हजार ९९२ एवढी मते मिळाली आहेत.

६८० मतांनी धीरज लिंगाडे हे पहिल्या फेरीत समोर आहेत. पदवीधर मतदार संघात एकूण २ लाख ६ हजार १७२ मतदारांची नोंदणी झाली होती. मतदान केवळ ४९.६७ टक्‍के इतके झाले. मतदानाचा घसरलेला टक्‍का कुणासाठी फायदेशीर ठरणार याची चर्चा सध्‍या रंगली आहे.

उमेदवारांनी गृह जिल्‍ह्यांमध्‍ये शक्‍ती दाखवण्‍याचा प्रयत्‍न केला. प्रभावी अपक्ष उमेदवारांमध्‍ये होणारी मतविभागणी, शिक्षक आणि कर्मचारी संघटनांच्‍या भूमिकांचा परिणाम निकालावर जाणवणार आहे. त्यामुळे या निकालाची उत्सुकता ताणली गेली आहे.

दरम्यान, विदर्भात भाजपसाठी ही निवडणूक चुरशीची लढाई मानली जात असून आत्तापर्यंतच्या निकालावरुन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला अधिक पसंती मिळाल्याची परिस्थिती आहे.

Tags

follow us