Ravikant Tupkar यांचं पोलीस ठाण्यातच अन्नत्याग आंदोलन

बुलढाणा : शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नावर आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani shetkari Sanghatana) रविकांत तुपकरांसह (Ravikant Tupkar) दोनशे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शनिवारी रविकांत तुपकर यांच्या आंदोलनावळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर रविकांत तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता तुपकर यांनी पोलीस स्थानकातच अन्नत्याग आंदोलन सुरु केलंय. जोपर्यंत लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत अन्नाचा एक […]

Ravikant Tupakar

Ravikant Tupakar

बुलढाणा : शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नावर आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani shetkari Sanghatana) रविकांत तुपकरांसह (Ravikant Tupkar) दोनशे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शनिवारी रविकांत तुपकर यांच्या आंदोलनावळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर रविकांत तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता तुपकर यांनी पोलीस स्थानकातच अन्नत्याग आंदोलन सुरु केलंय. जोपर्यंत लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत अन्नाचा एक कणही घेणार नसल्याची भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतली आहे.
YouTube video player
रविकांत तुपकर यांनी शनिवारपासून जेवण केलेलं नाही, त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

Uday Samant यांचा मोठा दावा म्हणाले, आघाडीतील 20 ते 22 आमदार संपर्कात

याप्रकरणी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ताब्यात घेतलेल्या 200 कार्यकर्त्यांचाही अन्नत्याग आंदोलनात सहभाग आहे. बुलढाण्यातील आंदोलन प्रकरणी स्वाभिमानी नेते रविकांत तुपकर यांच्यासह इतर 18 जणांवर बुलढाणा शहर पोलिसांनी दंगल करणे, शासकीय कामात अडथळा आणणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

सध्या रविकांत तुपकर यांना अटक केली असून त्यांच्यासोबत इतरही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना अज्ञातस्थळी पोलीस कोठडीत ठेवलं आहे.

Exit mobile version