Download App

Buldhana Bus Accident : ‘तो’ अपघात समृद्धी महामार्गामुळे नव्हे तर मद्यधुंद बस चालकामुळे?

समृद्धी महामार्गावर बुलढाण्यातील सिंदखेडराजाजवळ झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्स बसचा अपघात समृद्धी महामार्गामुळे नाही तर बस चालक मद्यधुंद अवस्थेत असल्यानेच झाल्याची शक्यता फॉरेन्सिक अहवालात उघड झाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच विदर्भ बसचा भीषण अपघात घडला. गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असल्याने अपघाताचं कारण समृद्धी महामार्गच असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

Breaking News : शरद पवारांना धक्का ! आणखी तीन आमदार अजितदादांच्या गळाला ?

1 जुलै रोजी समृद्धी महामार्गावर विदर्भ बसचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात 25 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. अपघातानंतर बस चालकाची वैद्यकीय तपासणी केली असता बस चालकाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये अधिकचं अल्कोहोल आढळून आलं आहे. अमरावतीच्या रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (RFSL) च्या अहवालानुसार, बसचा चालक शेख दानिशच्या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल मर्यादेपेक्षा 30 टक्क्यांपेक्षा जास्त होते.

भ्रष्टाचार त्यांचा रक्तात, नाना पटोलेंनी भाजपवर डागली तोफ

राज्यात ब्लड अल्कोहोल कंटेंट (BAC) म्हणजेच रक्तात अल्कोहोलचं मान्य प्रमाण 100 मिलिलीटर रक्तात 30 मिलीग्राम अल्कोहोल एवढं असून दानिश शेखच्या रक्तात त्यादिवशी 30 टक्के जास्त अल्कोहोल आढळलं आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गावरचा अपघात महामार्गामुळे नाही तर बस चालकाच्या दारु पिल्याने झाला का? ही शंका उपस्थित होते आहे.

शिंदेंचे किती आमदार परतणार? राऊतांनी थेट आकडाच सांगितला

या दुर्घटनेत आत्तापर्यंत 23 मृतदेहांचे डीएनए अहवाल समोर आले असून दोन मृतदेहांचे अहवाल अद्याप बाकी आहेत. अपघात झाल्यानंतर बसला आग डिझेलमुळे लागली होती. त्यामुळेच अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला. फॉरेन्सिक टीमकडून बसचा टायर फुटला होता का? याचीही तपासणी केली जात आहे. त्यासाठी टायरच्या खुणा आणि नमुनेही तपासण्यात आले. पण, निष्कर्षावरून ही शक्यता फेटाळण्यात आली आहे.

हा अपघात 30 जून आणि 1 जूनच्या मध्यरात्री घडला होता. फॉरेन्सिक टीमकडून बस चालकाच्या रक्ताचे नमुने 1 जुलैला घेतले होते. याचदरम्यान, बस चालकाच्या रक्तातीह अल्कोहोलचे प्रमाण कमी झाल्याची शंकाही तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. जेव्हा अपघात घडला तेव्हा अल्कोहोलचं प्रमाण तपासण्यात आलं. पण त्यापेक्षा अधिक जास्त असल्याची शक्यताही आहे.

Tags

follow us