Download App

मोठी बातमी! जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस आमदार सुनील केदारांची आमदारकी रद्द

  • Written By: Last Updated:

Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर अखेर त्यांची आमदारकी देखील रद्द करण्यात आली आहे. या कथित घोटाळ्यामध्ये केदार हे प्रमुख आरोपी आहेत. त्यानंतर विधिमंडळाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

Houthi Drone Attack : धक्कादायक! भारताचा झेंडा असलेल्या जहाजावर हुती बंडखोरांचा ड्रोन हल्ला

नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने (Nagpur Session court) जिल्हा बँकेतील 150 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात केदार यांच्यासह सहा जणांना पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. तर प्रत्येकी साडेबारा लाखांचा दंडही ठोठाविला आहे. 2002 मध्ये केदार बँकेचे अध्यक्ष असताना 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात गुन्हे दाखल होऊन तपास सुरु झाला होता. आता या प्रकरणात बँकेने सुनील केदार, मुख्य रोखे दलाल केतन शेठ, बँकेचे तत्कालिन मॅनेजर अशोक चौधरी यांच्यासह आणखी तीन जणांना दोषी ठरवून शिक्षा झाली आहे.

Sanjay Raut : बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, बावनकुळेंचा व्हिडिओ.. राऊतांच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट!

काय आहे प्रकरण?

1999 मध्ये सुनील केदार नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. या दरम्यानच्या काळात बँकेने होम ट्रेड लिमिटेड, इंद्रमणी मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंच्युरी डिलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि गिलटेज मॅनेजमेंट सर्व्हिसेस या खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून सरकारी रोखे (शेयर्स) खरेदी केले. पण या कंपन्यांकडून खरेदी केलेले शेअर्स प्राप्त झाले नाहीत किंवा ते बँकेच्या नावेही झाले नाहीत. कंपन्यांनी बँकेची रक्कमही परत केली नाही. कालांतराने या कंपन्या देखील दिवाळखोरीत निघाल्या.

दरम्यान या प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. आता रुग्णालयातील त्यांचा मुक्काम आणखी वाढण्याची शक्यता आहे. काल (23 डिसेंबर) रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांचा रुग्णालयातील मुक्काम काही दिवस वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून केदार यांना मायग्रेनचा त्रास होत आहे.

आज (24 डिसेंबर) सुनील केदार यांचा एमआरआय सीटीस्कॅन काढण्यात आला. तसेच त्यांच्या काढण्यात आलेल्या ईसीजीत काही बदल दिसून आले आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना अँजिओग्राफी करण्याचाही सल्ला दिला आहे. या दोन कारणांमुळे आमदार केदार यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे. दर दोन तासांनी त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेण्यात येत आहे.

आज (24 डिसेंबर) वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर उद्या किंवा परवा त्यांच्यावर अँजिओग्राफी केली जाईल. जर सुनील केदार यांचा रुग्णालयातील मुक्काम एक आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिला तर वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना एक अहवाल द्यावा लागेल. जर त्यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला तर वैद्यकिय अहवालानुसार पुढील निर्णय घ्यावा लागेल. सध्या सुनील केदार यांना तीव्र मायग्रेनचा त्रास होत असून त्यांच्या ईसीजीतही काही बदल दिसून येत असल्याचे सांगण्यात आले.

Tags

follow us