Download App

एका हमालाची कमालच…यूट्यूबवर पाहून घरीच थाटला नोटांचा कारखाना

जळगाव : युट्युबवर सध्या अनेकजण सक्रिय असतात. अनेकांकडून नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी युट्युबचा उपयोग केला जातो. काही जण सदुपयोग करतात तर काहीजण दुरुपयोग करतात. याची प्रचिती जळगावच्या चोपड्यातील कुसूंबा गावात घडलीय. युट्युबवर चलनी नोटा कशा बनवल्या जाताता याचं संशोधन करुन हमाल कामगाराने चक्क बनावट नोटा बनवण्याचा कारखानाच सुरु केल्याचं उघड झालंय.


राहुल कलाटे म्हणाले, चिंचवडची निवडणूक विकासावर नाही तर भावनेवर…

गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात बनावट चलनी नोटा आल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी सुत्रे हालवत आपली यंत्रणा सक्रिय केली. तपासाअंती एका व्यक्तीकडून बनावट नोट बनवण्याच काम सुरु असल्याचं समोर आलं. बनावट नोटा तयार करणाऱ्या या अवलियाला रंगेहाथ पकडायचं कसं हे आव्हान पोलिसांसमोर उभं असतानाच पोलिसांनी पोलिस खाकीची शक्कल लढवित त्याला पकडलंय.

Maharashtra Weather Update : राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता, बळीराजाचं टेन्शन वाढलं !

बनावट नोटा तयार करणारा देविदास पुंडलिक आढाव (वय ३१) हा कमी पैशांत खोट्या नोटांच्या डील करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधून एक सापळा रचला. आम्हाला 50 हजार रुपयांत दीड लाख रुपये देण्याची डील पोलिसांनी त्याच्याकडे केली.

ठरल्यानूसार ठरलेल्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला. सुरुवातीला आरोपीला संशय आला नाही मात्र, त्याला संशय आल्यानंतर त्याने पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला.. मात्र, कानून के हाथ लंबे होते है हेच खरं, अखेर पोलिसांनी त्याला गावाबाहेर एका टेकडीवर बोलाविले.

आढाव दुचाकी घेऊन त्याठिकाणी उभा होता. पथकातील दोन कर्मचारी अगोदर पुढे गेले आणि त्यांनी त्याच्याकडून नोटा पाहून त्याला ताब्यात घेतले. तसेच लपलेले इतर कर्मचारी देखील तिथे पोहचले.

पथकाने आढाव यांच्याकडून १००, २०० आणि ५०० च्या १ लाख ६८ हजार ९०० रुपयांच्या नकली नोटा व त्याच्या घरून प्रिंटर, रंग आणि नोटा छपाईचे कागद हस्तगत केले. दरम्यान, उपविभागीय पोलिस (Police) अधिकारी संदीप गावित यांच्या पथकाने सापळा रचून अटक केली. गावित यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोपाळ देशमुख, पोलिस कर्मचारी महेश महाले, रवींद्र मोतीराया, नीलेश पाटील, सचिन साळुंखे, सुहास पाटील, राहुल बैसाने, रेवानंद साळुंखे, चंद्रकांत पाटील, विजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Tags

follow us