दोनशे रुपये हप्ता घेणाऱ्याला मंत्री केले, उद्धव ठाकरेंचा संजय राठोडांवर निशाणा

Uddhav Thackeray On Sanjay Rathore : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवीचं दर्शन घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत बोलताना मंत्री संजय राठोड यांचावर निशाणा साधला. माझ्याकडून चुकले 200 रुपये हप्ता घेणाऱ्याला मंत्री केले. पण तो हफ्ते घेत होता हे मला माहित नव्हत. असा […]

WhatsApp Image 2023 07 09 At 6.54.45 PM

WhatsApp Image 2023 07 09 At 6.54.45 PM

Uddhav Thackeray On Sanjay Rathore : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवीचं दर्शन घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत बोलताना मंत्री संजय राठोड यांचावर निशाणा साधला. माझ्याकडून चुकले 200 रुपये हप्ता घेणाऱ्याला मंत्री केले. पण तो हफ्ते घेत होता हे मला माहित नव्हत. असा टोला यावेळी ठाकरेंनी मंत्री संजय राठोड यांना लगावला. (Two hundred rupees installment taker made minister, Uddhav Thackeray targets Sanjay Rathore)

आजच्या सभेचे चित्र पाहून आंधळ्या निवडणूक आयोगाचे डोळे उघडले असतील. पूर्वी मतपेटीतून सरकार जन्माला यायचं आता खोक्यातून सरकार जन्माला येते. राज्यात गद्दारांचं लाचारांचं सरकार आहे. गद्दारांकडून हे राज्य वाचू दे देवीकडे अशी मागणी केली.

मजबूत सरकार असताना त्यांना राष्ट्रवादी का फोडावी लागली असा सवाल यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपला केला. यावरून असे दिसते की भाजप बाजारबुणग्यांनाच पक्ष आहे.असा घणाघात यावेळी ठाकरेंनी भाजपवर केला.

मतदान कोणाला ही द्या, सरकार आमचंच येणार; ठाकरेंचा भाजपला टोला

बाळासाहेब ठाकरे लोकांच्या मनात आहेत. त्यांना कोणीही काढू शकत नाही. भ्रष्टाचाराने माखलेल्या लोकांच्या सतरंज्या आता भाजपमधील निष्ठावंत अंधभक्त उचलत आहेत. राज्यात आता फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. पूर्वी मतपेटीतून सरकार जन्माला यायचं आता खोक्यातून सरकार जन्माला येते.

मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मेहनतीला यश मिळू दे, अशी प्रार्थना आम्ही केली. आपण एकटे आहोत, असे त्यांना वाटते. भाजपला ठाकरे नको शिवसेना हवी. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव ते जनतेच्या मनातून काढू शकत नाही. असा इशारा यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला.

शेतकरी खूश आहेत का, वीज मिळते, कर्जमाफी मिळाली आहे का, सरकारची मदत मिळते का? महाविकास आघाडीच्या काळात संकटकाळात शेतकऱ्यांना मदत मिळाली होती ना,असा सवालही त्यांनी विचारला.

Exit mobile version