NIA Action : नागपूरमध्ये दोघे पाकिस्तानच्या संपर्कात, एनआयएच्या धाडीत धक्कादायक माहिती

नागपूर : नागपूरमध्ये एनआयएने धाड टाकली आहे. नागपूरमधील हंसापुरी भागात ही झाडाझडती घेतली जात आहे. दोन लोकांची विचापूस एनआयएकडून केली जात आहे. या लोकांकडून पाकिस्तानशी व्हाट्सअॅप चॅटींग केली जात असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. पहाटे 4 वाजल्यापासून हे धाडसत्र सुरू झालं आहे. यामध्ये पाकिस्तानशी व्हाट्सअॅप चॅटींग करणाऱ्या दोघांची विचारपूस […]

NIA NAGPUR

NIA NAGPUR

नागपूर : नागपूरमध्ये एनआयएने धाड टाकली आहे. नागपूरमधील हंसापुरी भागात ही झाडाझडती घेतली जात आहे. दोन लोकांची विचापूस एनआयएकडून केली जात आहे. या लोकांकडून पाकिस्तानशी व्हाट्सअॅप चॅटींग केली जात असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

पहाटे 4 वाजल्यापासून हे धाडसत्र सुरू झालं आहे. यामध्ये पाकिस्तानशी व्हाट्सअॅप चॅटींग करणाऱ्या दोघांची विचारपूस करण्यात आली. पोलिसांचा मोठा ताफा या भागात यावेळी तैनात करण्यात आला आहे. या दोघांची चौकशी करण्याच आल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे की, या लोकांकडून पाकिस्तानशी व्हाट्सअॅप चॅटींग केली जात आहे. अख्तर राजा वलद मोह आणि अहमद राजा वल्ड मोह अशी या दोघांची नाव आहेत.

Maharashtra Police : फडणवीसांचे गृहखाते अजितदादांच्या रडारवर; म्हणाले, आता पोलिसांनाच..

या दोघांची एनआयएकडून पहाटे 4 ते सकाळी 8 वाजेपर्यंत कसून चौकशी करण्यात आली. तर या चौकशीनंतर सध्या त्यांना केवळं एनआयएकडून नोटीस बजावण्यात आली आहे. याअगोदरही या दोघांना इफ्ताप पार्टीमध्ये वाद घातल्या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांनी चौकशी करून सोडूनही देण्यात आले होते.

Exit mobile version