Uddhav Thackeray criticizes On BJP : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवीचं दर्शन घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत बोलताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. अजित पवारांच्या बंडाचा पुरावा देत मतदान कोणाला द्या, सरकार आमचंच येणार असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला. (Uddhav Thackeray criticizes On BJP)
आपल्यातील 40 जण त्यांच्यात गेले. मजबूत सरकार असताना त्यांना राष्ट्रवादी का फोडावी लागली ,असा सवाल यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपला केला. भाजप बाजारबुणग्यांनाच पक्ष आहे. त्यांना एकट्याने काही होत नाही. त्यांना नेहमी दुसऱ्यांची गरज लागते. त्यांच्याकडे सगळे बाजारबुणगे आहेत. असा घणाघात यावेळी ठाकरेंनी भाजपवर केला.
ठाकरे म्हणाले, पूर्वी मतपेटीतून सरकार जन्माला यायचं आता खोक्यातून सरकार जन्माला येते. राज्यात गद्दारांचं लाचारांचं सरकार आहे. गद्दारांकडून हे राज्य वाचू दे देवीकडे अशी मागणी केली. अमित शहा यांच्यासोबत आपले अडीच वर्षे भाजप शिवसेनेचा मुख्यमंत्री असे ठरले होते.मात्र, त्यांनी शब्द फिरवला. त्यांना ठाकरे नको, मात्र ठाकरेंची शिवसेना हवी आहे.
अजितदादांनी बंड केलं पण, पडद्यामागं काय शिजलं? चव्हाणांनी केला धक्कादायक खुलासा
मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मेहनतीला यश मिळू दे, अशी प्रार्थना आम्ही केली. आपण एकटे आहोत, असे त्यांना वाटते मात्र, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव ते जनतेच्या मनातून काढू शकत नाही. असा इशारा यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला.
शेवटी उद्धव ठाकरेंनी मोदींना लक्ष केले.पंतप्रधानांनी राष्ट्रवादीवर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. दोन दिवसांनी त्याच पक्षातील एक गट त्यांच्यात समील झाला. पंतप्रधानांनी मणीपूरबाबत काहीही भाष्ट केले नाही. मणीपूरबाबत आम्ही त्यांना तोडगा देतो. त्यांनी आमच्याकडे यावे.