60 Naxalites Ssurrender Before CM Devendra Fadnavis In Gadchiroli : माओवाद्यांच्या (Naxal) सेंट्रल कमिटी तसेच पॉलिट ब्युरो सदस्य आणि अत्यंत वरिष्ठ नक्षल कमांडर मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ सोनू उर्फ भूपती याने आपल्या 60 सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर (Gadchiroli Police) आत्मसर्मपण केले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नक्षलवाद्यांच्या समाप्तीचा चॅप्टरला सुरूवात झाल्याचे फडणवीसांनी सांगितले. यावेळी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना फडणवीसांच्या हस्ते संविधानाची प्रत सुपर्द करण्यात आली. भूपतीवर सहा कोटी रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आले होते. आमचा संकल्प आहे, पुढच्या पाच ते सात वर्षांमध्ये गडचिरोली आणि लगतच्या चंद्रपुरात किमान एक लाख स्थानिक भूमिपूत्रांना चांगल्या पद्धतीचा रोजगार आम्ही देणार आहोत. त्यांचं जीवन पूर्णपणे बदलण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
संविधान न्याय देऊ शकत नाही अशी भावना झाली अन्…
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, आदिवासी समाजातील तरुण-तरुणी भरकटले गेले असे फडणवीस म्हणाले की, व्यवस्थेविरोधात संभ्रम निर्माण केला गेला. संविधान न्याय देऊ शकत नाही अशी भावना झाली. आदिवासी समाजातील तरुण-तरुणी भरकटले गेले. तेलंगणा, गडचिरोली भागात नक्षलवाद्यांचा म्होरक्या म्हणून भूपतीने जबाबदारी स्वीकारत मोठा लढा उभा केल्याचे फडणवीस म्हणाले.
आत्मसमर्पण केलेल्या सर्वांचं उचित पुनर्वसन केलं जाणार
ज्यांनी आत्मसमर्पण केलंय, त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की तुम्ही भारतीय संविधान स्वीकारलेलं आहे. तुम्ही संविधानाच्या मुख्य धारेत आला आहात, आता याच संविधानाने तुमच्याकरिता जो न्याय अपेक्षित केला आहे, तो न्याय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा काम राज्यातलं सरकार केल्याशिवाय थांबणार नाही. आत्मसमर्पण केलेल्या सर्वांचं उचित पुनर्वसन केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही”, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
गडचिरोली, चंद्रपूर भागात तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक- फडणवीस
“आज गडचिरोली हे स्टील मॅग्नेट बनतंय. गडचिरोली आणि चंद्रपूर या भागात जवळपास तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आलेली आहे. मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होतेय. गुंतवणूक करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हाला ज्या सवलती पाहिजेत त्या आम्ही देऊ, पण आमची अट एकच असेल. तुमच्याकडे जी मंडळी कामाला लागतील त्यातली 95 टक्के मंडळी ही भूमीपुत्रच असली पाहिजेत. स्थानिकांनाच इथे रोजगार मिळाला पाहिजे,” अशी अट फडणवीसांनी घातली.
🕦 11.32am | 15-10-2025📍Gadchiroli.
LIVE | Media Interaction#Maharashtra #Gadchiroli https://t.co/sgqRVY7AAb
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 15, 2025
भूपतीच्या आत्मसमर्पणासाठी जंगलातही गेलो असतो
कार्यक्रमानंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, भूपती यांची इच्छा होती की, माझ्यासमोर त्यांना आत्मसमर्पण करायचे होते. याबाबत ज्यावेळी वरिष्ठांनी चर्चा केली त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, भूपती यांनी मला जंगलात जरी बोलावलं तरी मी यायला तयार आहे. पण, जंगलाच्या ऐवजी त्यालाच इकडे आणून इथे आत्मसमर्पण पार पडलेले आहे. ही अतिशय महत्त्वाची घटना होती त्यामुळे मी या कार्यक्रमासाठी मी सर्व कार्यक्रम रद्द करून तडकाफडकी गडचीरोलीला आल्याचेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.