Maboj Jarange On Bachu Kadu Protest : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करुन त्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू (Bachu Kadu) यांच्या नेतृत्त्वाखाली नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातील मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत आज (दि.30) संध्याकाळी सातच्या सुमारास चर्चा करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहे. यापूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) आंदोलनस्थळी दाल होत बच्चू कडूंना पाठिंबा दिला तसेच सरकराने टाकलेल्या डाव प्रतिडावानेच मोडावा लागेल असे म्हटले आहे. मी शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून आंदोलनात सहभागी झाल्याचेही यावेळी जरांगेंनी सांगितले.
बच्चू कडू मागं हटेनात! सरकारच्या शिंष्टमंडळाने घेतली भेट, चर्चेअंती घेतला मोठा निर्णय
नेतृत्वाचा संदेश नीट ऐका
आंदोलनस्थळावर उपस्थितांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले की, आंदोलनावेळी नेतृत्व काय संदेश देत आहे हे नीट ऐकण्याचा सल्ला दिला. त्यांनी मराठा आंदोलनाचे उदाहरण दिले. नेतृत्वाची तळमळ, कष्ट वायाला जाऊ देऊ नका. जे इप्सित साध्य करण्यासाठी आले ते साध्य करण्यावर लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले. शांतता आणि संयम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
पहिल्या दिवशी सरकारने कोर्टाचा डाव टाकला
मुंबईच्या बैठकीबाबत मला माहिती नाही. मी त्यात पडणार नाही. जा किंवा नका जाऊ असे मी सांगणार नाही. मी अंतरवालीची बैठक रद्द केली. काल मला खूप वाईट वाटले, पहिल्याच दिवशी सरकारने कोर्टाचा डाव टाकला. कडू म्हणत होते तुम्हीही चला मुंबईला, मी म्हटले नाही. त्यांना इकडे यायला काय झालेय, असा सवाल मनोज जरांगे यांनी विचारला.
Video : फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणात अंधारेंनी समोर आणला महत्त्वाचा पॉईंट; पुरावाही दाखवला
शेतकरी आंदोलन अन् आमच्या आंदोलनात फरक
मी स्पष्ट सांगितलंय की, शेतकरी आंदोलनात आणि आमच्या आंदोलनात फरक आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यातलं मला ज्ञान नाही, त्यामुळे मी काय बोलणार? ज्याच्यातलं मला ज्ञान आहे ते मी बोलतो, शेतकरी संघटनेचे नेते सगळं बरोबर करतील अशी आशा असल्याचे जरांगे म्हणाले. पण, सरकारला घोडे लावल्याशिवाय ते वठणीवर येणार नाही असा हल्लाबोल जरांगे पाटील यांनी केला. सगळ्या शेतकरी संघटनांचे बहाद्दर, नेते एकाच जागी आले हे मी पहिल्यांदाच पाहिल्याचे कौतुक त्यांनी यावेळी केले. ही एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
काही निर्णय पटणार नाही
शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या बच्चू कडूंनीदेखील यावेळी संवाद साधला ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी मुंबईत बोलविले आहे. मी आणि सहा जणांचे शिष्टमंडळ चर्चेसाठी जात आहोत. चर्चेत काही निर्णय घेतले जातील ते कोणाला पटणार नाहीत, तर, कोणाला पटतील. उभारण्यात आलेले आंदोलन सोपे नसल्याचे सांगत मूळ मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचा स्पष्ट संदेशही यावेळी कडूंनी दिला.
