Devendra Fadnavis On Sanjay Gaikwad Slap Issue : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिळे अन्न देणाऱ्या कँटिन चालकाला चोपले होते. यावरुन विरोधकांनी रान उठवल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्र्यांनी गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यास फ्रि हँड दिला होता. त्यानंतर आता पोलिसांना गायकवाड यांच्यावर मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर शिंदेंचे बॉक्सर आमदार अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे.
Video : थोडं वाचतं चला; भाषावादात ब्रिजभूषण सिंह यांचं राज ठाकरेंच्या शिक्षणावर बोटं
कारवाईसाठी पोलिसांना फ्रि हँड
माध्यमांशी बोलताना फडणवीसांना गायकवाड यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, याप्रकरणात पोलिसांनी निश्चित चौकशी केली पाहिजे. त्यासाठी कोणीही तक्रार करायची गरज नाही. दखलपात्र गुन्हा असेल तर पोलीस कारवाई करतील असं म्हणाले होते. गुन्हा दखलपात्र आहे की अदखलपात्र आहे, त्यानुसार कारवाई होईल. किती जोरात मारले आहे, यावर गुन्ह्याचे स्वरुप ठरते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. फडणवीसांनी केलेले विधान हे एकप्रकारे गायकवाड यांच्यावर कारवाईसाठी पोलिसांना दिलेला फ्रि हँडच मानला जात होता. अखेर कारवाई झाली. मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गायकवाड यांच्या विरोधात मारहाण प्रकरणी NC म्हणजेच अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra | Taking suo motu cognisance, Mumbai Police's Marine Drive police station is in the process of registering a case against Shivsena MLA Sanjay Gaikwad, who slapped an Akashvani MLAs canteen staff member allegedly for poor food quality. This comes after a purported…
— ANI (@ANI) July 11, 2025
Video : फडणवीसांची रिप्लेसमेंट होणार?, शिंदेंची शाहांना मोठी ऑफर; राऊतांचा खळबळजनक दावा
केलेल्या मारहाणीचा पश्चाताप नाही – गायकवाड
कँन्टीन चालकाला केलेल्या मारहाणीनंतर गायकवाड यांनी आपण केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप मला होत नसून, मी झालेल्या मारहाणीबाबत माफी मागणार नाही. मी विष प्राशन करणार होतो, इतर लोक हे समजू शकत नाहीत, म्हणूनच मी जे केले त्याचा मला कोणताही पश्चात्ताप नसल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.
आमदार साहेब असं वागणं बरं नव्हे! संजय गायकवाड: शिवीगाळ, मारहाण, महापुरुषांचा अपमान आणि बरंच काही
शिंदेंकडूनही निंदा
मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या घटनेचा निषेध केला होता. शिंदे म्हणाले होते की, आमच्या आमदाराला दिले जाणारे जेवण वाईट होते. तथापि, मी हिंसाचाराचे समर्थन करत नाही, जर काही समस्या असेल तर आम्हाला कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार आहे, परंतु एखाद्याला मारहाण करणे योग्य नाही.
🕦 11.28am | 11-7-2025📍Vidhan Bhavan, Mumbai.
LIVE | Media Interaction#MonsoonSession2025 #Mumbai #Maharashtra https://t.co/NZFEDcYo0S
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 11, 2025