नागपूर : फडणवीसांच्या कुटुंबात राजकारणातला मीच शेवटचा असेन पण दिविजाला राजकारणात यायचं असेल तर तिने जरूर यावं असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे. त्यांच्या या उत्तरानंतर येणाऱ्या काही वर्षात फडणवीसांची मुलगी दिविजा हिची राजकारणात एन्ट्री होणार असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. फडणवीस नागपूरमध्ये जिव्हाळा पुरस्कार वितरण समारंभात प्रकट मुलाखतीत बोलत होते.
आमच्या घरात सर्वांत प्रज्ज्वल दिविजा – फडणवीस
मुलाखतीदरम्यान फडणवीसांनी मुलगी दिविजाचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले की, खरंतर मी नेहमी गंमतीने म्हणतो की, आमच्या घरात सर्वांत प्रज्ज्वल दिविजा आहे. करण तिचं वय अवघे 15 आहे. पण तिच्यात खूप प्रगल्भता आहे. यावेळी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमधील किस्सादेखील फडणवीसांनी सांगितला.
निवडणूक काळात अडचणीत येणारे अन् क्रूर प्रश्न विचारले जातात
ते म्हणाले की, आता निवडणुकीच्या काळात माझी मुलगी दिविजालाही अनेक माध्यमांनी प्रश्न विचारले. त्यात निवडणूक काळात अनेकदा अडचणीत येणारे आणि क्रूर प्रश्न विचारले जातात असे म्हणत तिला तुझे वडील मुख्यमंत्री होतील का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर दिविजाने ‘जो होईल तो महायुतीचा होईल. नेते ठरवतील तो मुख्यमंत्री होईल.’ असे उत्तर दिल्याचे फडणवीसांनी सांगितले. तिचे हे उत्तर म्हणजे तिच्यातील प्रगल्भता असल्याचे फडणवीस म्हणाले.
फडणवीसांच्या कुटुंबात राजकारणातला मीच शेवटचा असेन पण…
तिच्या उत्तरावरून तिला तिला अंतर समजतं. तिला माहितेय की राजकारणात अशाप्रकारे टार्गेट केलं जातं. मी, आई किंवा अमृताने दिविजाला काही शिकवलं नाही. ती तिचंच शिकली आहे”, असे कौतुकाचे शब्दही फडणवीस यांनी लेकीसाठी काढले. यावर दिविजा आता फडणवीसांच्या घरातील राजकारणात येणारं पुढचं नेतृत्त्व असेल असा विश्वास मुलाखतकाराने व्यक्त केला. त्यावर फडणवीसांनी दिविजाला राजकारणात यायचं असेल तर तिने जरूर यावं. पण फडणवीसांच्या कुटुंबात राजकारणातला मीच शेवटचा असेन असेही फडणवीस सांगायला विसरले नाहीत.
— NEWSDAILY MEDIA GROUP (@NEWSDAILY123) January 10, 2025