Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Dasara Melava Speech : ठाकरे गटाच्या कालच्या दसरा मेळाव्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मात्र, फडणवीसांनी प्रतिक्रियेनंतर आता ठाकरे गट आणि भाजपात शाब्दिक वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरेंनी माझे हजार रूपये वाचवले असे फडणवीस हसत हसत म्हणाले. मात्र, पुढच्याच शब्दात फडणवीसांनी त्यांच्या शैलीत ठाकरेंना (Uddhav Thackeray) शालजोडीत ठेवत टीका केली आहे. त्यांच्या या टीकेवर आता ठाकरे गटाकडून काय प्रतिउत्तर मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ते मुंबईमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.
फडणवीस इतके बनावट की, झेरॉक्स तरी बरी निघते; ‘बच्चू’ भाऊंची कडू टीका…
देवेंद्र फडणवीसांना ठाकरेेंच्या दसरा मेळावा आणि त्यांच्या भाषणावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना फडणवीसांनी सर्वात पहिले ठाकरेंचे हजार रूपये वाचवल्याबद्दल मनपूर्वक आभार मानले. मी पत्रकारांना विचारलं की, मला एक हजाराचा फटका आहे का? असे विचारले. कारण मी आवाहन केले होतं की उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासाच्या संदर्भातील एक मुद्दा दाखवा आणि १ हजार रुपये मिळवा असे आव्हान केले होते.
मी, ठाकरेंचे भाषण ऐकले नाही पण ज्यावेळी ज्याेवळी काही जणांकडून माहिती घेतली त्यावेळी अनेकांनी ठाकरेंनी त्यांच्या भाषणात विकासाचा एक मुद्दा घेतला नसल्याचे सांगतले. त्यामुळे ठाकरेंनी त्यांच्या भाषणात विकासाच्या मुद्द्यावर न बोलल्याने माझे एक हजार रूपये वाचल्याचे फडणवीस म्हणाले. ठाकरेंच्या भाषणावेळी सभेला पुढे माणसही नव्हती असा टोलाही फडणवीसांनी लगावला. त्यांनी नेहमीच्या पद्धतीने लोकांच्या संदर्भात, विकासाच्या संदर्भात, लोककल्याण कसं करणार, राज्याला पुढे कसं नेणार, पालिकेला पुढे कसं नेणार, याबद्दल अवाक्षरही न काढता मी जे बोललो ते सत्य करुन दाखवलं आणि माझे 1000 रुपये वाचवल्याचे फडणवीस म्हणाले. Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Dasara Melava Speech
Udhav Thackeray : संघाच्या मेहनतीला लागलेले भाजप विषारी फळच; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा घणाघात…
दसरा मेळाव्याच्या उपस्थितांना संबोधित करताना ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला खुलं आव्हान देत ठकरेंनी झेंड्यावरचा हिरवा रंग काढून दाखवा. एका परिषदेला पाकिस्तानमध्ये गेले म्हणून सोनम वांगचूक हे देशद्रोही ठरले. मग गुपचूप पाकिस्तानला जाऊन केक खाणारे मोदी कोण? (PM Modi) असाही सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी सभेत केला.
हिंदुत्वावरून आमच्या अंगावर येऊ नका, तुमच्या टोप्या घातलेल्या फोटोचंं प्रदर्शन लावल्याशिवाय राहणार नाही, असं ओपन चॅलेंज मोहन भागवत यांचंं नाव घेत उद्धव ठाकरेंनी दिलंय. हिंदुत्वाचं ढोंग अन् देशभक्तीचं सोंग सोडा. भाजपला प्रेमाने सांगतोय, संधींचं सोनं करा. ही संधी खूप मोठी आहे. अशी कोणाला संधी मिळत नाही, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. अंधाऱ्या खाईत जायचं नसेल, तर शिवसेनेची मशाल हाती घ्या, असं आवाहन करत प्रत्येक चहाच्या टपरीवर बसून चाय पे चर्चा सुरू करा, असे ठाकरेंनी काल सांगितलं.
🕐 12.45pm | 3-10-2025📍Mumbai.
LIVE | Media Interaction#Maharashtra #Mumbai https://t.co/5r4d6OQRAv
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 3, 2025