Devendra Fadnavis On Digital Arrest : गेल्या काही दिवसांपासू डिजिटल अरेस्ट करण्याचे आणि त्यामाध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर आले आहेत. याच कळीच्या मुद्यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल अरेस्ट प्रकरण नेमकं काय? आणि असे झाल्यास काय करावे यावर अगदी सखोल माहिती दिली आहे. ते अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी सभागृहात बोलत होते.
डिजिटल अरेस्टबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, तुम्ही सीबीआयच्या जाळ्यात अडकणार
…तर हा फ्रॉड समजा
डिजिटल अरेस्टबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्यातील सर्व नाहरिकांना सर्वात पहिले सांगतो की, डिजिटल अरेस्ट असा कुठला प्रकारच नसून, कायद्याममध्ये कुणालाही डिजिटली अरेस्ट करता येत नाही. त्यामुळे आपल्यापैकी कुणाला एखाद्याने डिजिटल अरेस्टचा फोन किंवा व्हिडिओ कॉल केला तर, पहिल्याक्षणी समजून जा की हा फ्रॉड असून, यावर कधीही विश्वास ठेवू नका असे आवाहन फडणवीसांना नागरिकांना केले. कुणीही कुठल्याही कायद्यांवन्ये कुणालाही डिजिटल अरेस्ट करू शकत नसल्याचेही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केले. Devendra Fadnavis On Digital Arrest
बापरे! अख्खं कुटुंब पाच दिवस डिजीटल अरेस्ट; एफडी मोडली, कुटुंबाने गमावले 1.10 कोटी..
डिजिटन अरेस्ट नेमकं कसं होतं?
डिजिटल अरेस्ट नेमकं कसं होतं? त्यावर फडणवीसांना सांगितले की, तुम्हाला एक फोन किंवा व्हिडिओ कॉल येतो, त्या व्हिडिओ कॉलवर समोर बसलेली व्यक्ती कधी स्वतःला सीबीआय, पोलीस किंवा कस्टमचा अधिकारी सांगतो. त्यानंतर तुम्ही पार्सल मागवलं होतं का? असा प्रश्न विचारून त्यात ड्रग्ज सापडल्याचे सांगून तुम्हाला याक्षणापासून डिजिटल अरेस्ट करत असल्याचे सांगतो. या सर्व कचाट्यातून सुटण्यासाठी समोरच्या व्यक्तीकडून मांडवलीसाठी लाखोंची मागणी केली जाते. त्याक्षणला घाबरून सामान्य माणून समोरील व्यक्तीला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करत जातो असे फडणवीस म्हणाले. यात फक्त सर्व सामान्यांची फसवणूक होते असे नाही तर, एक निवृत्त आयएएस अधिकाऱ्याचीदेखील फसवणूक झाली आहे. एवढेच नव्हे तर, इंडियन नेव्हीमधून उच्च पदावरील निवृत्त अधिकाऱ्यानेही घाबरून पैसे देऊन टाकल्याचे फडणवीसांनी यावेळी सभागृहात सांगितले.
सायबर फसवणूक रोखण्यासाठी RBI चा मोठा निर्णय; एप्रिलपासून सुरू होणार नवं डोमेन
फसवणूक करणारी व्यक्ती करार न झालेल्या देशात
ज्यावेळी घाबरलेली व्यक्ती पैसे ट्रन्सफर करते त्यावेळी काही मिनिटांमध्ये हे पैसे विदेशातील खात्यांमध्ये जमा होतात. काही प्रकरणांमध्ये फसवणुकीचं ऑपरेशन हे विदेशातून होत असल्याचेही समोर आले असून, संबंधित व्यक्ती भारतासोबत करार नसलेल्या देशात बसलेली असते तर, तुम्हाला फोन करणारी व्यक्ती त्यांचे हँडलर असतात त्यांनी नीड टू नो बेसिसवर माहिती असते पण, पूर्ण ऑपरेशनची माहिती नसते असेही फडणवीसांनी सांगितले.
5000 सायबर कमांडो तयार होणार, वाढणार सुरक्षा, अमित शहांचा मोठा निर्णय
फोन आला तर 1930 वर कॉल करा
कुणालाही डिजिटल अरेस्टबाबत फोन आला तर, त्याक्षणी हा कॉल फसवणुकीचा आहे हे लक्षात घेऊन त्याचवेळी 1930 या सायबर नंबरला फोन करण्याचे आवाहन फडणवीसांनी नागरिकांना केले आहे. याबाबतची प्रचंड मोठी व्यवस्था आपल्याकडे उभी असून, जरी तुम्ही घाबरून पैसे दिले असले तरी गोल्डन अवरमध्ये तक्रार केली तर, वेगवेगळ्या खात्यांमध्ये जमा होणारे पैसे थांबवू शकतो असे फडणवीसांनी सांगितले.
डिजिटल फसवणूक टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध माध्यमातून जनजागृती केली जात आहे. मात्र, त्यानंतरही कुणा ना कुणाची फसवणूक याद्वारे केली जात आहे. त्यामुळे अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी सावधगिरी हाच उपाय असून, अशा प्रकारचा फोन आल्यास नागरिकांनी थेट 1930 या नंबरला फोन करण्याचे आवाहन फडणवीसांनी नागरिकांना केले आहे.
If anyone receives a phone or video call related to a 'Digital Arrest', they must immediately report it by calling at 1930.
कोणालाही डिजिटल अरेस्ट संदर्भात फोन, व्हिडिओ कॉल आला तर थेट '1930' या नंबरवर तक्रार करावी.
(विधानसभा, मुंबई | दि. 24 फेब्रुवारी 2026)#Maharashtra… pic.twitter.com/tcOY1XQYHV
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 24, 2026
