मुंबई : विधानसभेच्या निकालानंतर मला अनेकजण येऊन भेटल्याचे सांगत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) लागलेल्या निकालावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावेळी निकालानंतर आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एक व्यक्ती भेटल्याचेही यावेळी राज यांनी सांगितले. विधानसभेच्या निकालानंतर शांत होतो, विचार करत होतो असेही राज ठाकरेंनी सांगितले. ते मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात उपस्थितांना संबधित करताना बोलत होते. (Raj Thackeray Speech In MNS Melava)
Video : तुमचं प्रेम कुणासमोर लाचार ठेवणार नाही; स्वार्थासाठी येणाऱ्या भाजपला ‘राज’ यांचा थेट संदेश
निवडणुकीचा निकाल लागल्यावर बरेच लोक भेटले. ज्या दिवशी निकाल लागला, मी बोलतो ते तुम्हाला समजत असेल. तुम्हाला माहीत आहे. महाराष्ट्रात निकाल लागल्यावर पहिल्यांदा सन्नाटा पसरला. ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला हवा होता, मिरवणुका काय सगळं… सन्नाटा. कारण लोकांमध्येच संभ्रम होता. असा कसा निकाल लागला असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले की, माझ्याकडे संघाशी निगडीत असणारी एक व्यक्ती आली होती. त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं की त्यांनाही हे पटलेलं नाहीये. या भेटीवेळी ती व्यक्ती माझ्यासमोर एक छान वाक्य बोलली. ते म्हणाले की, इतना सन्नाटा क्यों है भाई? असे म्हणत कुणीतरी तर जिकलं असेल आणि त्यातून जल्लोष होईल पण महाराष्ट्रामध्ये जो सन्नाटा पसरला हे कसलं द्वोदक आहे? असा प्रश्नही राज यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच काही काही गोष्टींवर विश्वासच बसत नसल्याचे सांगितले.
शरद पवारांना 10, अजित पवारांना 42 अन् मनसेचं मतदानच गायब; राज ठाकरेंना मोठा संशय
…तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या
यावेळी राज ठाकरेंनी विधानसभेला झालेल्या मतदानावरूनही प्रश्नचिन्ह उपस्थित केला. ते म्हणाले की, तुम्ही कुठे मनात धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही. लोकांनी आपल्याला मतदान केलं. पण केलेलं मतदान कुठे तरी गायब झालं असे म्हणत एकूणच घडलेल्या गोष्टींसह एकप्रकारे EVM वरदेखील शंक उपस्थित केली आहे. त्यामुळे जर असे घडणार असेल तर, अशा प्रकारच्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या असे राज ठाकरे म्हणाले.
केलेलं काम लोकापर्यंत पोहचवत राहा
यावेळी राज ठाकरेंनी उपस्थित मनसे पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आपण केलेली कामं लोकापर्यंत पोहचवा अशा सूचना केला. मनसेने केलेली कामं, आंदोलनं लोकांसमोर मांडत रहा, असे राज ठाकरेंनी सांगितले.