मुंबई : भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांना सोबत घेतलं आणि पदं दिली. भाजपचे लोक भेटायला येतात पण मी तुम्हाला दिसत नाही असे सांगत मी माझा मराठी बाणा बोथाट करणार नाही तसेच तुमचं प्रेम कुणासमोर लाचार ठेवणार नाही असा थेट संदेश राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्वार्थासाठी राजकीय भेटीगाठी घेणाऱ्या भाजपसह अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांना दिला आहे. ते मनसेच्या पदाधिकारी मेळ्याव्यात बोलत होते.
Video : इतना सन्नाटा क्यों है भाई? संघाच्या व्यक्तीलाही पडला प्रश्न; राज ठाकरेंनी काय सांगितलं?
भाजपावर जोरदार हल्लाबोल
उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरेंनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांना सोबत घेतलं आणि पदं दिली. भाजपने आरोप केलेले सर्व जण हे भाजपसोबत आज मंत्रिमंडळात आहेत. 70 हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना आत टाकू असं मोदी म्हणालेले. पण मला हे माहिती नव्हते की मोदी घोटाळा करणाऱ्यांना तुरूंगात टाकण्याऐवजी मंत्रिमंडळात टाकतील.
किरीट सोमय्या यांनी इतके आरोप केले…ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे आता भाजप मध्ये आहेत… भूमिका बदलली म्हणून विचारत नाही…पण बदनामी आपली करतात. राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेस मध्ये होते, विरोधी पक्षनेते होते भाजप मध्ये गेले महसूल मंत्री झाले आता मंत्री आहेत..हर्षवर्धन पाटील, नारायण राणे असे अनेक नेते आहेत.
शरद पवारांना 10, अजित पवारांना 42 अन् मनसेचं मतदानच गायब; राज ठाकरेंना मोठा संशय
पक्षाला शिस्त आणण्यासाठी एक आचारसंहिता आणणार
पक्षाला शिस्त लागण्यासाठी आचारसंहिता दिली जाणार असल्याचे सांगत काही पदांची नाव बदलली जातील असे राज ठाकरेंनी यावेळी पदाधिकाऱ्यांना सांगितले. मी अनेक पराभव पाहिले, विजय ही पहिले असल्याचे सांगत पराभवाने खचलो नाही. खचलेले, पिचलेले अश्या लोकांचे नेतृत्व मला करायचे नाही..माझ्या बरोबर राहायचे तर ठामपणे रहा असेही राज यांनी यावेळी स्पष्ट केले.