Download App

Video : देवेंद्र फडणवीस प्रभू श्रीराम यांच्यासारखे चारित्र्यवान; आमदार परिणय फुकेंची स्तुतीसुमनं

  • Written By: Last Updated:

MLA Parinay Fuke On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे प्रभू श्रीराम यांच्यासारखे चारित्र्यवान, श्रीकृष्णासारखी चातुर्य बुद्धी, देवाधी देव महादेव यांच्यासारखी सहनशक्ती असणारे, आणि त्यांच्यासारखे विष पचवणारे,तसेच सूर्यासारखे तेज असणारे, चंद्रासारखे शीतल असणारे असल्याचे कौतूक आमदार परिणय फुके (Parinay Fuke) यांनी केले आहे. अभिमन्यूसह फडणवीसांची तुलना म्हणजे कमी लेखणं असल्याचेही फुके यांनी म्हटले आहे. फडणवीस आमच्यासाठी देवतुल्यच असल्याचेही फुके म्हणाले. ते विधान परिषदेत बोलत होते.

फुके नेमकं काय म्हणाले?

विधान परिषदेत बोलातान फुके म्हणाले की, विरोधी पक्षातील नेत्यांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात आली. तुम्ही फडणवीसांवर इतक बोलता जसं की तुम्ही त्यांचा पोवाडाच वाजवत आहेत. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी तर तुम्ही फडणवीसांची आरतीच गाता अशा प्रकारची विरोधकांची भाषणं आहेत. या सर्व टीकांना उत्तर देताना हो आम्ही फडणवीसांची आरतीच गातो असे फुके म्हणाले. कारण, फडणवीस आमच्यासाठी देवतुल्यच आहेत.

म्हणून फडणवीसांची आरती 

गेल्या 10 वर्षांपासून ज्याप्रकारे सातत्याने या महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचे काम त्यांनी केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम फडणवीसांनी केले. एवढेच नव्हे तर, जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे कामही फडणवीसांनी केल्याचे फुके म्हणाले. फडवीसांनी देशात राज्याला एक नंबरवर नेण्याचे काम केले आहे म्हणून आम्ही त्यांची देवमाणून म्हणून आरती करतो.

पुढे बोलताना फुके म्हणाले की, फडणवीस देव आहेत की नाही हे मला माहिती नाही पण, ते शंभर टक्के देवमाणूस आहेत हे सभागृहाती प्रत्येक सदस्याला आणि राज्यातील जनतेला मानावचं लागेल असे फुके म्हणाले. फडणीसांनी ज्या पद्धतीने काम केले आहे ते बघता ते खऱ्या अर्थाने देवतुल्य आहेत. त्यांची स्तुती ही आरती नव्हे तर, आमचं कृतन्घ्य व्यक्त करण्याचे माध्यम आहे.

follow us