फडणवीसांनीही मदत केली नाही; भाजप नेते परिणय फुकेंच्या भावजयीने उघड केले खळबळजनक पत्ते

फडणवीसांनीही मदत केली नाही; भाजप नेते परिणय फुकेंच्या भावजयीने उघड केले खळबळजनक पत्ते

Priya Phuke : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात अत्याचाराची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजंच असताना राज्यातील इतरही जिल्ह्यांमधून तशी प्रकरणं समोर येत आहेत. (Phuke) भाजप नेते परिणय फुके यांच्या भावजय प्रिया फुके यांनीही आपली कैफियत माध्यमांसमोर मांडली. भाजपचे आमदार परिणय फुके यांच्याकडून गुंडाकरवी मला दररोज धमकावले जात आहे. मी दररोज पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे. मी याविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही दाद मागितली होती. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनीही मला ‘बघतो बघतो’ सांगण्यापलीकडे कोणतीही मदत केली नाही, असा गंभीर आरोप परियण फुके यांचे दिवंगत बंधू संकेत फुके यांच्या पत्नीने केला आहे.

मी माझ्या लाडक्या भावांच्या दारात गेले, पण ते माझ्या पाठीशी उभे राहिले नाही. पण सुषमा अंधारे, रोहिणी खडसे उभ्या राहिल्या असं म्हणत प्रिया फुके यांनी बोलायला सुरूवात केली. मी दीड वर्षांपासून लढतेय. 2012 मध्ये माझं संकेत फुकेशी लग्न झालं. मी लाडकी सून होते, सगळी हॅप्पी फॅमिली होती. मात्र 2022 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. संकेत यांचं किडनी ट्रान्सप्लांट झालं होतं. मात्र, त्यांनी ते लपवून लग्न केलं. नंतर कळलं, तेव्हा मी त्यांना विचारलं. मात्र, त्यांनी मला धमक्या दिल्या. मी माझ्या आईने सांगितल्यानुसार खूप लक्ष देऊन कुटुंबाला सांभाळलं. आम्ही सगळे आनंदात राहत होतो. मला दोन मुलं आहेत. आमचं चांगलं सुरू होतं. मात्र, त्यांना इन्फेक्शन वाढलं आणि त्यांचा 2022 मध्ये मृत्यू झाला. असं प्रिया फुके म्हणाल्या.

राजेंद्र हगवणे एकपट तर त्याला मदत करणारा दुप्पट; चोंधे कुटुंबाचा धक्कादायक कारनामा समोर

त्यानंतर मला धमक्या आल्या. तू काही बोललीस तर मारून टाकू अशा धमक्या दिल्या. त्यानंतर त्यांचे पैशांचे, संपत्तीचे व्यवहार यांनी आपसात करून घेतले. म्हणून, मी संपत्तीबद्दल प्रश्न विचारला आणि आपण एकत्रच आहोत हे सांगितलं. तेव्हा त्यांचा इगो हर्ट झाला, आम्हाला हे का विचारलं असं म्हणत त्यांनी ‘तू काही बोललीस तर तुला संपवू अशा धमक्या मला दिल्या महिला आयोगावर आरोप करताना प्रिया फुके म्हणाल्या, माझ्या तक्रारीरीची महिला आयोगानेही दखल घेतली नाही.

माझी तक्रार घेण्यासाठी सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत बसवून ठेवतात पोलीस स्टेशनमध्ये. आम्ही सर्वांना विकत घेऊ शकतो, तुझी केस आम्ही बोर्डावर येऊ देणार नाही अशा धमक्या मला मिळत राहतात. मी इथे पत्रकार परिषदेला येतानाही माझ्यामागे काही लोक होते” असं प्रिया फुके म्हणाल्या आहेत. मी आता आईकडे राहते, पोलिसांकडे जाऊन तक्रार करतेय. दीड वर्षांपासून लढतेय. मात्र, मलाच त्रास देण्यात आलाय. सातत्यानं धमकावलं जातं असंही प्रिया फुके म्हणाल्यात.

काय म्हणाल्या अंधारो?

पोलिसांची भूमिका ही प्रिया फुके यांच्याविरोधात राहिली आहे. प्रिया फुके यांनी आरोपाचे पुरावे सादर करा, असा समन्स वारंवार पोलीस पाठवतात. त्यामुळे आम्ही पत्रकार परिषदेत सर्व पुरावे सादर केले. प्रिया फुके यांच्या विनयभंगाची तक्रार घेतली नाही. मात्र, आरोपीच्या तक्रारीवरून अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. प्रिया फुके या लढाईत एकटी पडली होती. त्यामुळे आम्ही तिच्यासोबत उभे आहोत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या