विवाह हा सोहळा नाही तर इव्हेंट होतोय का? दिवसाला दीड कोटी, वैष्णवीच्या लग्नात ओतला पाण्यासारखा पैसा
marriage विवाह हा सोहळा न राहत फक्त इव्हेंट होत आहे का? ज्यामुळे नात्यांकडे प्रेम आपुलकी माणुसकी म्हणून न पाहता अर्थिकदृष्ट्या तोलले जात आहे.

Is marriage not a ceremony but an event? One and a half crores a day, money poured into Vaishnavi’s wedding : लग्नसंस्थेमध्ये विवाहसोहळा हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. खरंतर तेथूनच वैवाहिक आयुष्याला सुरूवात होते. मात्र त्यातील काही प्रथा परंपरांमुळे समाजात काही दुर्दैवी घटना देखील घडतात. याचच एक ताज उदाहरण म्हणजे पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण हे प्रकरण जेवढं हुंडाबळी म्हणून चर्चेला आलं. त्याहून जास्त यामध्ये चर्चा झाली ती वैष्णवीच्या वडिलांना तिच्या सासरच्याना दिलेल्या वेगवेगळ्या महागड्या वस्तू आणि वारेमाप खर्च करून केलेला शाही विवाह सोहळा याची. त्यामुळे सध्या सोशल मिडिया आणि समाजात एकच चर्चा सुरू आहे ती विवाहसोहळ्यांमध्ये केला जाणारा खर्च खरचं गरजेचा आहे का? त्याचबरोबर विवाह हा सोहळा न राहत फक्त इव्हेंट होत आहे का? ज्यामुळे नात्यांकडे प्रेम आपुलकी माणुसकी म्हणून न पाहता अर्थिकदृष्ट्या तोलले जात आहे. याचाचं प्रत्यय हगवणे आणि यासांरख्या असंख्य लग्नसोहळ्यांमधून येत आहे. एवढं नक्की.
वैष्णवी हगवणेच्या वडिलांनी केला प्रचंड खर्च!
हुंडा किंवा इतर भेटवस्तू देण्यासाठी हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या वडिलांवर दबाव टाकला.त्याचबरोबर लग्नात तब्बल दीड कोटींचा खर्च करण्याचा करण्यास देखील भाग पाडल्याचं समोर आलं आहे. यासाठी तिच्या वडिलांनी तब्बल दहा लाख रुपयांचा भाडं असलेलं आलिशान रिसॉर्ट लग्नासाठी भाड्याने घेतलं.या सोहळ्यातील फक्त स्टेज डेकोरेशन साठी तब्बल 22 लाख रुपये मोजण्यात आले होते.
वीस लाख हुंड्यासाठी छळवणूक; महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न…, राजेंद्र हगवणे कनेक्शन समोर
50 हजार पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आली होती.ज्यांचा जेवणाचा प्रत्येकी खर्च एक हजार रुपये असे तब्बल 50 लाख रुपये जेवणावर खर्च करण्यात आले.सत्कार स्वागत आणि कपड्यांसाठी वेगळा मोठा खर्च झाल्याचे देखील सांगितले गेले.तर या लग्न सोहळ्याचं कंत्राटेका खाजगी इव्हेंट कंपनीला देण्यात आलं होतं.त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला होता.तसेच लग्नामध्ये हगवणे कुटुंबांना 51 तळे सोनं,चांदीची भांडी,फॉर्च्युनर गाडी त्यानंतर देखील या कुटुंबाच्या मागण्या सुरू होत्या त्यामध्ये दीड लाखांचा फोन या आशा असंख्य मागण्या झाल्याच्या सांगण्यात येत आहे.
ती बातमीच खोटी!मुयरी जगतापच्या दाव्यांचे राज्य महिला आयोगाकडून खंडण
दरम्यान हुंडा ही प्रथा कायद्याने जरी बंद झाली असली. तरी देखील ती अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे आजही कायम आहे. श्रीमंत आणि गर्भ श्रीमंत कुटुंब त्यांच्या मुलींच्या सुखासाठी आजही मुलाच्या घरच्यांना प्रचंड प्रमाणात पैसा संपत्ती दागिने आणि शाही विवाह सोहळे करून देतात. मात्र गरिब आणि मध्यम वर्गीय कुटुंब यामध्ये विनाकारण भरडली जातात. कारण श्रीमंत लोकांमुळे समाजात नको त्या प्रथा रूढ होतात. ते पाहुन मध्यमवर्गीय मुलींच्या सासरचे देखील अवास्तव मागण्या करतात. त्यातून विवाहितेंचा मात्र बळी जातो. तर आजच्या सोशल मिडीयाच्या काळात हे जास्त फोफावत चाललय. कारण प्रत्येकाकडून आपली प्रत्येक गोष्ट सोशल मिडीयावर पोस्ट केली जाते. पण शेवटी ही विचारसरणी आहे. हे देखील तेवढंच खरं आहे. त्यामुळे मुलीच्या पालकांनी आपल्या मुलीच्या सुखासाठी का दिला असेना. हुंडा देणे आणि घेणे दोन्ही गोष्टी चुकीच्याच असल्याचं आपल्या मुला-मुलींना पटवून दिलं पाहिजे. शेवटी प्रेम आणि जिव्हाळ्याचं नातं शाश्वत असतं अन् अर्थिक आधारावर उभे राहिलेले नात्यात भिंती उभ्या राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.